नाशिक

Mahanubhav Sammelan: श्री चक्रधर स्वामींच्या जन्मस्थळासाठी कायदेशीर लढा द्यावा लागेल : शरद ढोले

प्रतीक जोशी

Mahanubhav Sammelan : आपल्या देशातील शेकडो स्थानांवर अतिक्रमण झाले आहे. राम मंदिरासाठी सुमारे ३० वर्षांचा कायदेशीर लढा द्यावा लागला, तेव्हा आपल्या राम मंदिरात रामाच्या मूर्ती प्रतिष्ठेचा सूर्योदय पाहायला मिळतोय. कृष्ण जन्मभूमीसाठीही ५० वर्षे संघर्ष करावा लागला. त्यामुळे भडोच येथील श्री चक्रधर स्वामींचा वाडा मिळवायचा असेल तर संघर्ष करावाच लागेल.

यासाठी एकजुटीने कायदेशीर लढा द्यावा लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय धर्मजागरण समितीचे प्रमुख शरद ढोले यांनी बुधवारी (ता. २०) येथे केले. (Sharad Dhole statement legal fight has to be fought for Shri Chakradhar Swami birth place nashik news)

गुजरातमधील बलसाड जिल्ह्यातील वाळविहीर येथे तीनदिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलन व श्रीमद् भगवद्‍गीता जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी संमेलनाचे उद्‍घाटन झाले. या वेळी धर्मसभेत ते बोलत होते. संमेलनातील धर्मसभेस महंत जामोदेकर बाबा (उत्तर प्रदेश) अध्यक्षस्थानी होते.

या वेळी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विध्वंस बाबा (फलटण), महंत बाभुळगावकर बाबा (परभणी), महंत विश्वनाथबाबा कोठी (नांदेड), महंत शुकमुनी बाबा, महंत तेल्हारकर बाबा (परभणी), महंत सुकेणेकर बाबा (सुकेणे), संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर पाटील, आमदार जितूभाई चौधरी (गुजरात), माजी आमदार बाळासाहेब सानप (नाशिक), दत्ता गायकवाड, प्रकाशशेठ ननावरे, राजेंद्र जायभावे, अरुण महानुभाव, छबू नागरे, साहेबराव आव्हाड, प्रवीणदादा शेवलीकर, भागवताचार्य चिरडे बाबा, ना. जि. म. परिषदेचे अध्यक्ष कृष्णराजबाबा मराठे, कार्याध्यक्ष वाल्हेराजबाबा पातूरकर, डोळसकरबाबा शास्त्री, भाईदेवमुनी मानेकर, दत्तराजबाबा चिरडे, सायराजबाबा शास्त्री, कृष्णराजबाबा विद्वांस, अचलपूरकर बाबा, गोपीराजशास्त्री सुकेणेकर, दामोदरअण्णा पाथरे, महेंद्रमुनी कपाटे, बाळकृष्णदादा लोणारकर, बुद्धीसागरबाबा कपाटे आदी संत, महंत, तपस्विनी यांची उपस्थिती होती.

पहाटेपासूनच नामस्मरण, देवपूजा वंदन, भगवद्‍गीता पारायणला सुरवात झाली. धर्मसभेच्या प्रारंभी संत, महंत व मान्यवरांच्या हस्ते महानुभाव पंथाच्या ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. वाळविहीर येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिराचे कलशारोहण व उद्‍घाटन आणि मूर्तिपूजन करण्यात आले. यानंतर संमेलनाच्या भव्य सभामंडपाचे फित कापून उद्‍घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गीता पूजन, श्रीकृष्ण पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

ढोले यांनी गीता जयंतीचे महत्त्व अधोरेखित करीत गीतेचा जन्म कसा झाला, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की आज केवळ महानुभाव पंथाच्याच नव्हे, तर संपूर्ण भारतातील शेकडो मंदिरे व तीर्थस्थानांवर अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी आपल्याला कायदेशीर लढाई करावी लागेल.

अध्यक्षीय मनोगतात महंत जामोदेकर बाबा म्हणाले, की दिनकरअण्णा पाटील यांनी धर्मजागृतीसाठी या कार्यक्रमाचे याठिकाणी आयोजन केले आहे. त्यामुळे येथे आलेल्या प्रत्येकाने श्री चक्रधर स्वामींच्या जन्मस्थान मुक्तीचा संकल्प घेऊन दिनकर पाटील यांच्याबरोबर उभे राहत कार्यक्रम यशस्वी करावा. महंत बाभूळगावकर बाबा यांनी श्री चक्रधर स्वामींचे जीवन तत्त्वज्ञान सांगितले. आदिवासी व दुर्गम भागातील महानुभाव पंथीयांच्या मनातील श्रद्धा मोठी आहे, एकीच्या बळातून जन्मस्थान ताब्यात मिळेल, अशी भावना महंत विश्वनाथबाबा कोठी यांनी व्यक्त केली; तर महंत शुकमुनी बाबा यांनी गीता जयंतीचे महत्त्व सांगितले.

या वेळी महानुभाव पंथाचे सर्व साधू, संत, महंत, तपस्विनी, वासनिक, उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सीमा पेटकर यांनी सूत्रसंचालन केले.

दिनकर पाटील यांनी मांडली स्पष्ट भूमिका

दिनकर पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले, की श्री चक्रधर स्वामी यांचे भडोच येथील जन्मस्थान वाडा आपल्या ताब्यात मिळावा, यासाठीच्या लढाईची ज्योत आपण आता पेटवली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि माजी मंत्री व विद्यमान आमदार जितूभाई चौधरी यांच्याकडे आपण पाठपुरावा करीत आहोत. यासाठी आपण कायदेशीर लढाई लढून विजय मिळवू. ज्या देवाची भक्ती आपण करतो, त्याचे स्थान पुन्हा मिळावे या उद्देशानेच हे संमेलन गुजरातमध्ये होत आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी बोलून दाखवली.

पंतप्रधान, गृहमंत्र्यांना निमंत्रण

संमेलनाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, भाजप गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ आदींसह गुजरातमधील खासदार, आमदार व मंत्रिगण, तसेच महाराष्ट्रातील खासदार, आमदार व मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे या संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT