Sharad Pawar announcement of resign from post of party president decision made repercussions in rural areas nashik news esakal
नाशिक

Sharad Pawar Resign : शरद पवार यांच्या निर्णयाचे ग्रामीण भागात पडसाद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकारण सोडून पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने या निर्णयाचे ग्रामीण भागात पडसाद उमटले. (Sharad Pawar announcement of resign from post of party president decision made repercussions in rural areas nashik news)

बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज दुपारी निदर्शने करून पवार साहेबांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे देतील, असा इशाराही तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी राजकारण सोडून निवृत्ती घेण्याचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचे आज मुंबई येथे जाहीर केले. वृत्तवाहिन्यांवरून हे वृत्त शहर व तालुक्यात पोहोचताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या.

बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज दुपारी येथील बसस्थानकासमोर तीव्र निदर्शने करून शरद पवारांच्या घोषणा देण्यात आल्या. ‘महाराष्ट्रचा बुलंद आवाज, शरद पवार - शरद पवार...’ अशा घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष केशव मांडवडे म्हणाले, शरद पवार हे देशातील शेतकर्‍यांचे नेतृत्व करणारे, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले नेते आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पन्नास वर्षांहून अधिक काळ सुसंस्कृत राजकारण करणारे पवार साहेब सर्वच पक्षांतील नेत्यांना आदर्शवत आहे. त्यांचा निवृत्तीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी व नागरिकांसाठी धक्का देणारा असून ही क्लेशदायक घटना आहे.

शरद पवारांच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता व्यवस्थित झाला असून आम्हा सर्वांना हा निर्णय नामंजूर आहे. त्यांनी आपला निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा आम्ही सर्व पदाधिकारी आपापल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचेही तालुकाध्यक्ष श्री.मांडवडे यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ज.ल.पाटील, ज्येष्ठ नेते जिभाऊ सोनवणे आदींची भाषणे झाली. यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे, माजी नगरसेवक भारत काटके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित वाघ, अमोल बच्छाव, जनार्दन सोनवणे, सुनील पवार, आनंद सोनवणे, साहेबराव सोनवणे, भास्कर सोनवणे, हिरामन गांगुर्डे, केदा सोनवणे, नितिन मांडवडे , बबलू खैरणार, सनीर देवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT