NCP President Sharad Pawar along with senior leader Manikrao Shinde and workers esakal
नाशिक

Sharad Pawar News: येवलेकराच्या पंखात बळ भरणारे पवारांचे ते अर्धा तास!

माणिकराव शिंदेसह कार्यकर्त्यांशी दिलखुलास गप्पा अन्‌ समस्यांवर चर्चाही

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar News : सध्याच्या बिघडलेल्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा येवला मतदारसंघावरील प्रेम व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे व कार्यकर्त्यांना सुमारे अर्धा तास वेळ दिला.

काही सल्ले देऊन दुष्काळ व कांद्याप्रश्नी केंद्रापर्यंत बोलण्याचे आश्वासनही देऊन कार्यकर्त्यांच्या पंखात बळ भरले. (sharad pawar chat and discussion of problems with workers including Manikrao Shinde at yeola nashik news)

बीड येथील सभेनंतर येथे झालेल्या निषेध आंदोलनानंतर ज्येष्ठ नेते शिंदे शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरला शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते. येवलेकरांसाठी श्री. पवार यांनी दिलेला वेळ कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा ठरला.

प्रारंभी भुजबळांविरोधात झालेल्या आंदोलनाची माहिती दिली. केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा भावात घसरण सुरू असून, १५०० ते १७०० रुपयांदरम्यान दर आहेत. कांदा सडत असून, नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा, अशी मागणी शिंदे व कार्यकर्त्यांनी केली. श्री. पवार यांनी पाऊस व कांदा भावाप्रश्नी चर्चा केली. निर्यात शुल्क मागे करण्यासंदर्भात महाराष्ट्र व केंद्र सरकारशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले.

कांदा भावासंदर्भात कृषी मंत्री असताना शेतकरीहित डोळ्यासमोर ठेऊन घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. येवल्यातील सभेने नवचैतन्य निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांचा पाठीशी दुष्काळजन्य संघर्षात उभे राहणार आहे. पक्षवाढीबरोबरच संघर्षात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांसमवेत पाठीशी राहणार असल्याची ग्वाही श्री. पवार दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आमची संस्कृती खाल्या मिठाला जागण्याची आहे. काय दिले नाही पवार साहेबांनी, अजून काय करायला हवे होते, असा सवाल करत साहेबांवर वैयक्तिक टीका पुढील काळात खपवून घेणार नाही, असा इशारा मेहबूब शेख यांनी दिला.

आमदार रोहित पवारांनी दिलखुलास गप्पा मारल्या. पाणी-चाऱ्याची मागणी करून दुष्काळ जाहीर करावा, ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पदाधिकाऱ्यांशी शिंदे यांनी ओळख करून दिली.

प्रत्येकाच्या डोक्यावरील ‘येवलेकर साहेबांसोबत’ हे लिहिलेली टोपी लक्ष वेधून घेत होती. रायगड ग्रुपच्या गणेशोत्सवाच्या टी शर्टचे अनावरण झाले.

सुप्रिया सुळे यांनी आपुलकीने सर्वांची विचारपूस केली. माजी सभापती विठ्ठल शेलार, कलिदी पाटील, बाजार समितीच्या संचालिका उषा शिंदे, कल्पना शिंदे, ॲड. शाहू शिंदे, डॉ. संकेत शिंदे, अजीज शेख, रिजवान शेख, रामदास पवार, राजेश कदम, सुरेश कदम, प्रताप पाचपुते, झुंझार देशमुख, मधुकर देशमुख,

अरविंद शिंदे, सुभाष निकम, मजीद अन्सारी, नारायण मोरे, साईनाथ मढवई, राजेंद्र हिरे, सचिन कड, योगेश सोनवणे, नंदू दाणे, काका वाणी, नाना गायकवाड, दीपक लाठे, सद्दाम शेख, सुदाम सोनवणे, नारायण गायकवाड, फिरोज शेख, प्रमोद लभडे, बाळासाहेब खोडके, अनिल शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT