Amol Kolhe and office bearers looking at the building from the guard stationed in front of the NCP building  esakal
नाशिक

Nashik Sharad Pawar : राष्ट्रवादी भवनासमोर शरद पवारांचा ताफा थांबतो तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Sharad Pawar : सायरनच्या आवाजात मुंबई नाका मार्गे येवल्यासाठी रवाना झालेला शरद पवार यांचा ताफा मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन समोर अचानक थांबला आणि पोलिसांची तारांबळ उडाली. बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. (Sharad Pawar marched ahead seeing NCP Bhavan nashik news)

शरद पवार यांच्यासह खासदार अमोल कोल्हे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी भवन बघत पुढे मार्गक्रमण केले. हे राष्ट्रवादी भवन आपलेच ना, असा प्रश्न तर जणू त्या वेळी त्यांच्या मनात निर्माण झाला तर नसावा ना, अशी चर्चा काही वेळ परिसरात रंगली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडल्यानंतर प्रथमच पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शनिवार (ता. ८) दुपारी येवला येथील नियोजित सभेसाठी मुंबई नाका मार्गे येवला येथे जात असताना राष्ट्रवादी पुन्हा समोर रस्त्यावर अचानक शरद पवार यांचा ताफा थांबला.

रस्त्यात काही झाले तर नाही ना, अजित पवार गटाकडून रस्ता अडवण्यात आला तर नाही ना, अशा प्रकारचा समज परिसरातील नागरिकांमध्ये झाला. बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या पोलिसांनीही ताफा तांब्याच्या दिशेने धाव घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रत्यक्षात तसे काही झाले झाले नसल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, ताफा थांबताच शरद पवार यांनी वाहनातूनच राष्ट्रवादी भवन बघितले.

तर अमोल कोल्हे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी वाहनाच्या खाली उतरत हेच ते आपले राष्ट्रवादी भवन असे जणू म्हणत राष्ट्रवादी भवनाकडे हात करत आपसांत चर्चा केली. काही वेळ त्या ठिकाणी थांबून राहिले. या वेळी ताफ्यात असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता.

यातून एकप्रकारे शक्तीप्रदर्शन झाल्याचे आढळून आले. राष्ट्रवादी भवन बघितल्यानंतर पाचच मिनिटात ताफा येवल्याच्या मार्गाने मार्गस्थ झाला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Aadhaar Update : अलर्ट! आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल; हे कागदपत्र नसेल तर बदलता येणार नाही माहिती

Kamthi Assembly Election 2024 : कामठीमधील १७ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त...निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मते घेण्यात ठरले अपयशी

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...

Stock Market: महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर अदानी शेअर्समध्ये तुफान वाढ; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीत

SCROLL FOR NEXT