Sharad Pawar Sabha In Yeola 
नाशिक

Sharad Pawar Sabha Yeola: "धनंजय मुडेंचे वडील तीनवेळा पवारांकडे आलेले पण...", येवल्यातील सभेत आव्हाडांचा गौप्यस्फोट

Sandip Kapde

Sharad Pawar Sabha In Yeola: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आज छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात गेले आहेत. शरद पवार येवल्यात जाहीर सभा घेतली. खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे शरद पवार यांच्यासोबत आहेत. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाविरूद्ध दंड थोपटले आहेत.

लढू आणि जिंकू अशी घोषणा, शरद पवार यांच्या सभेतून देण्यात आली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे. रंग बदलणारे सरडे जास्त झाले आहेत. नाशिककरांसमोर आता नवीन आव्हान उभं आहे. पवारांनी आवाज दिला तेव्हा नाशिकने १४,१५ आमदार दिले, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार यांनी घरे फोडली असा आरोप होत आहे, गोपीनाथ मुंडेंच्या घरात शरद पवार यांना डोकावून देखील बघितलं नव्हतं. तिनदा गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ पंडीतराव मुंडे शरद पवार यांच्याकडे गेले होते आणि म्हणाले होते आम्हाला सोबत घ्या. तिन्ही वेळा साहेब नको म्हणाले. साहेब म्हणाले तुम्ही एक व्हा, हे शरद पवार यांचे शब्द होते.

जेव्हा भुजबळ बोलतात, पवारांनी मुंडेंचे घर फोडले. मात्र भुजबळ साहेब जरा खरं सांगा की शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांना फोन केला होती की घर सांभाळा घर फुटत आहे. हा माणूस कोणाच्याच घरात डोकावत नाही. फक्त साहेबांना विठ्ठल म्हणून नका, त्यांना दैवत म्हणू नका. कारण विठ्ठलावरती तलवार चालवणे, बापावर घाव घालणे, हे महाराष्ट्राच्या रक्तात नाही. हे तुम्ही करु नका, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT