sharad pawar nashik.jpg 
नाशिक

VIDEO : "संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर" - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - "संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होतो हे आमचं मत असून त्यांनी ते मागे घेतलंय त्यामुळे वादावर पडदा पडला आहे". असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री शरद पवार यांनी नाशिकमध्ये केले. ते नाशिकच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. 

विधानसभा निवडणूक प्रचार सुरुवात मी नाशकात केली. बदल व्हावा ही युवकांची भूमिका होती आणि त्याचा आम्हाला फायदा झाला असून पक्षांचं सरकार करतांना आम्ही काही निर्णय घेतले यात युवकांना रोजगार,औद्योगिक धोरण ठरवलं, शेती पुनर्बांधणी धोरण ठरवलं. आता या सरकारनं सत्तेचा योग्य वापर करावा ही अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांच्या पाठिशी हे सरकार

चीन सरकार प्रतिनिधी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मी एकत्रित बैठक करून दिली. द्राक्ष चायनाला पाठवण्यासाठी प्रयत्न करणार असून कांदा साठा धोरण आणी निर्यातबंदी रद्द करावी याकरिता मी दिल्लीत पियुष गोयल यांना भेटणार. 85 टक्के शेतकरी, 2लाखाच्या आत असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून येत्या अंदाजपत्रकात उरलेल्या 15 टक्के शेतकऱ्यांचा विचार केला जाईल.  ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यासाठी चर्चा सुरू आहे. दिलासा कसा देता येईल हा प्रयत्न आहे. केंद्रानं अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. 

राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असणाऱ्यांना चर्चा करून निर्णय

तसेच सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना अनेक लोकं भेटत असतात. सगळेच काही माहिती नसतात. महंमदअली रोडवर माझ्या सभेत हाजी मस्तान होता असंही वादळ उठलं होतं मात्र त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. परत राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असणाऱ्यांना चर्चा करून निर्णय घेणार

क्लिक करा > PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

मनसे आणी भाजप यांना एकत्र यावं असं वाटत असेल तर त्यांनी यावं
मनसे आणी भाजप यांना एकत्र यावं असं वाटत असेल तर त्यांनी यावं तसेच. निर्भया प्रकरणात कायद्यात तरतूद असेल त्याप्रकारे फाशी द्यावी. जाहीर फाशी अशी काही तरतुद नाही. या प्रकरणात लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT