Shravan Feri esakal
नाशिक

Sharvan Somvar: ब्रह्मगिरी फेरीने अखंड ऊर्जास्रोत! बम..बम.. भोलेच्‍या गजरात त्र्यंबकेश्‍वरला आज होणार रवाना

सकाळ वृत्तसेवा

Sharvan Feri : तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालण्याची प्रथा अनेक वर्षांपासूनची आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा म्हणजे जणू निसर्गाची आनंदयात्राच. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांनी प्रथम ब्रह्मगिरीची फेरी मारल्याची आख्यायिका सांगितली जाते.

दरवर्षी सहभागी होणारे भाविक यंदाही फेरीत सहभागी होण्यासाठी उत्‍साही आहेत. बम..बम.. भोलेचा गजर करताना रविवारी (ता.३) सायंकाळपासून भाविक त्र्यंबकेश्‍वरकडे रवाना होतील. (Sharvan Feri Brahmagiri feri provides continuous energy Today devotees leave for Trimbakeshwar in Bhole chanting nashik)

संपूर्ण श्रावण महिन्‍यात त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी बघायला मिळते. त्‍यातही सोमवारच्‍या दिवशी लक्षणीय गर्दी असते.

तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा नाशिककर अनेक वर्षांपासून जपत आहेत. जिल्हाभरातून भाविक फेरीसाठी त्र्यंबकनगरीत दाखल होतात. त्‍याप्रमाणे यंदाही भाविक सज्‍ज झाले आहे.

प्रदक्षिणेला रविवारी (ता. ३) सुरवात होईल. त्र्यंबकराजाचे दर्शन घेत आणि स्नान करत भाविकांकडून प्रदक्षिणेला सुरवात होईल. भाविकांमध्ये युवकांची संख्या लक्षणीय असते. यंदादेखील फेरीत सहभागी होण्यासाठी युवकांत उत्‍साह असल्‍याचे बघायला मिळाले.

आपल्‍या मित्र परिवारासोबत सहभागी होण्याचे नियोजन तरुणाईने आखले आहे. फेरीत अठरा वर्षांच्या तरूणांपासून वयाची सत्तरी गाठलेले अनेकजण भेटतात.

यातून निसर्गाकडून मिळणारा भरभरून आनंद व ऊर्जास्रोत पुढील वर्षभर पुरत असल्याचा स्वानुभव अनेकांनी कथन केला. तीनपेक्षा अधिक प्रदक्षिणा केलेल्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भाविक म्हणतात...

"ब्रह्मगिरीची फेरी तीन वर्षे केली आहे. शेतातून पायवाट काढून जीवनातील अडचणी विसरून शिवशंकराच्या जयघोषात रात्रभर चालत फेरी पूर्ण करण्याचा अनुभव वेगळाच आहे. एक वर्ष वीस, दोन वर्षे चाळीसची फेरी केली आहे."- स्वप्नील शाहू

"गत चार वर्षांपासून फेरीमध्ये सहभागी होत असून वेगळा अनुभव प्रत्येक फेरीतून मिळतो. यंदाही फेरी करण्याचे नियोजन असून सोमवारी फेरी पूर्ण होईल. वर्षभर तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ब्रह्मगिरी फेरी मदत करते." - आशिष राऊत

"ब्रह्मगिरी फेरी करून मनातील इच्छा पूर्ण झाल्याची अनुभूती आली आहे. रविवारी रात्री ब्रह्मगिरी फेरी सुरू करणार असून सोमवारी सकाळी फेरी पूर्ण होईल. फेरी मारताना साक्षात महादेव असल्याची अनुभूती मिळते. फेरी मारल्याने वर्षभर ऊर्जा कायम असते." - संकेत वैद्य

"अनेक वेळा ब्रह्मगिरी फेरी पूर्ण केलेली आहे. गत चार वर्षांपासून दरवर्षी जात आहे. पंधरा जणांच्या मित्रांच्या ग्रुपसह चाळीसची फेरी करण्याची अनुभूती वेगळी आहे. फेरीत रस्ता स्वतः शोधावा लागत असल्याने भक्त वीसचीच फेरी करतात. प्रत्येकाने ब्रह्मगिरी फेरीचा अनुभव एकदा तरी घ्यावा." - हृषीकेश शिंदे.

"जय शिवशंकर मित्र ग्रुपकडून सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर- ब्रह्मगिरीची चाळीस किलोमीटरची मोठी श्रावण फेरी सलग पाच वर्षे पूर्ण केली आहे. त्यावेळी ब्रह्मगिरी फेरीचा मार्ग खूपच चिखलमय खडतर होता. फेरीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात दगड-खडी व झाडाझुडपांनी अन् अंधारमय परिसर होता. पूर्ण फेरी करण्यात रात्रभर चालायचो. आता फेरीचा मार्ग चांगला झाला आहे. सर्व वयोगटातील शिवभक्तांना ब्रह्मगिरी श्रावण फेरी करण्यासाठी सुरळीत झाले आहे." - प्रकाश उखाडे

"म्हसरूळ गावातील आदिवासी मित्रमंडळातर्फे दरवर्षी ब्रह्मगिरी फेरीचे आयोजन केले जाते. मार्गावरील छोटे ओहोळ, नाले, मंदिरे व निसर्गाने भरभरून दान दिलेले हिरवेकंच डोंगर, झाडी मन प्रफुल्लित करतातच, परंतु शरीरातही नकळत एक ऊर्जास्रोत निर्माण करतो, जो पुढे वर्षभर पुरतो. मंडळाचे युवराज खराटे, भीमराव रोकडे, राजेंद्र गवारे आदींच्या नेतृत्वाखाली फेरीचा आनंद घेतो. याद्वारे नकळत मानसिक, आध्यात्मिक, शारीरिक सकारात्मक ऊर्जा तयार होते. गौतम ऋषी मंदिराजवळील टेकडीवरून दिसणारे निसर्गाचे आल्हाददायक रूप डोळ्यात साठविण्यासारखेच असते." - दत्तात्रेय डगळे, पंचवटी

"ब्रह्मगिरी फेरीचा आनंद आठ- दहा वर्षांपासून सहकुटुंब घेत आहे. फेरीतून साक्षात शिवशंभूच्या सानिध्यासह निसर्गाचा भरभरून आनंद मिळतो. फेरी तनमनातील अशुद्धता कमी करून खऱ्या अर्थाने शुद्ध भाव निर्माण करते. भगवंताचे सतत नामस्मरण केल्यास फेरीनंतर जाणवणारा थकवाही जाणवत नाही, ही साक्षात शिवशंभूचीच कृपा."

- पंडित गोवर्धने, सांजेगाव (ता. इगतपुरी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT