Shasan Aplya Dari  esakal
नाशिक

Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’मुळे वाहतुकीला बसणार फटका; असे आहे वाहतूक मार्गातील बदल..

सकाळ वृत्तसेवा

Shasan Aplya Dari : गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत येत्या शनिवारी (ता. १५) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होत आहे.

यासाठी जिल्हाभरातून शासकीय योजनांचे लाभार्थी या ठिकाणी उपस्थित राहणार असून, त्यांना कार्यक्रमस्थळी परिवहन महामंडळ व सीटीलिंक बसच्या माध्यमातून आणले जाणार आहे. तर ईदगाह मैदानावर बसची पार्किंग असणार आहे.

मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात होऊ घातलेल्या या कार्यक्रमामुळे शहरातील वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता असून, गंगापूर रोडवर कोंडी होऊन वाहतूक विस्कळित होण्याची शक्यता आहे. (shasan aplya dari Change in road routes on 15 july nashik news)

शनिवारी (ता. १५) होऊ घातलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे दहा लाख लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे.

या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित राहणार आहे. त्यांच्या गावपातळीवरून घेऊन येणे व परत पोच करण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर असणार आहे.

बसने लाभार्थी बसमधून थेट गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर येणार आहेत. तर या बस पार्किंगसाठी त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर थांबणार आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर लाभार्थींना पुन्हा त्याच बसमधून त्यांच्या मूळगावी पोच केले जाणार आहे, असे शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गंगापूर रोडवर एकेरी वाहतूक

शनिवारी (ता. १५) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे गंगापूर रोडवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशोक स्तंभाकडून येणारी वाहतूक रोखण्यात येऊन ती पर्यायी मार्गाने वळविली जाणार आहे. तर गंगापूर रोडकडून अशोक स्तंभाकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू राहील.

त्याचप्रमाणे, कॅनडा कॉर्नरकडून जुना गंगापूर रोडकडे जाणारी वाहतूकही रोखली जाईल. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाईल. लाभार्थ्यांना घेऊन येणारी वाहने थेट कार्यक्रमस्थळी येणार असल्याने त्याचाही अतिरिक्त ताण वाहतूक पोलिसांवर येणार आहे.

"शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पार्किंगव्यवस्था ईदगाह मैदानावर आहे. लाभार्थ्यांना घेऊन थेट कार्यक्रमस्थळी बस येणार आहेत. गंगापूर रोडवरील वाहतूक एकेरी केली जाणार आहे. नियोजन निश्चित झाल्यानंतर तशी अधिसूचना जारी केली जाणार आहे." - मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT