Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी शनिवारी (ता. १५) शहरात मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री, तसेच, जिल्हाभरातून हजारो लाभार्थी आले असताना, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि चोख नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
यामुळे दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने बंदोबस्ताच्या तणावात असलेल्या पोलिसांनी सायंकाळी सुटकेचा सुस्कारा सोडत मोहीम फत्ते केल्याचे समाधानही मिळाले. (shasan aplya dari police let out sigh of relief nashik news)
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सावंत, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार असल्याने शहरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, मोनिका राऊत यांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले होते.
वाहनाच्या पार्किंगसह ठिकठिकाणी बॅरिकेटींग करून पर्यायी मार्गांनी वाहतूक वळविली होती. मुख्यमंत्र्यांच्या ताफा मार्गावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता. तसेच, डोंगरे वसतीगृह मैदानावरही नागरिकांच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाची तपासणी केली जात होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सैनिकीपूर्व प्रशिक्षण संस्थेच्या उद्घाटनाच्या ठिकाणीही कडेकोट बंदोबस्त होता. त्यातच अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असतानाही नेमून दिलेल्या जागेवरून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चोख कर्तव्य बजावले.
गेल्या दोन दिवसांपासून शहर आयुक्तालयाचे अधिकारी-कर्मचारी सदरील कार्यक्रम निर्विघ्न पार पडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत होते. तसेच सातत्याने बंदोबस्ताचा आढावा घेतला जात होता. त्यामुळे दिवसभरातील सर्व कार्यक्रम कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्साहात पार पडल्यानंतर शहर पोलिस आयुक्तांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आयुक्तही भरपावसात
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. आयुक्तांनी स्वतः बंदोबस्ताची पाहणीही केली होती. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित असलेल्या कार्यक्रमस्थळी आयुक्त शिंदे उपस्थित राहून बंदोबस्तावर करडी नजर ठेवून होते.
कार्यक्रमस्थळी जोरदार पावसाने हजेरी लावली असता, आयुक्त शिंदे हे छत्री घेऊन रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावत होते. आयुक्तांच्या या कर्तव्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह दिसून आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.