Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात शिंदे शिवसेनेचा बोलबाला दिसून आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर, शिवसेना कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तसेच, भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांना दाद दिली. कार्यक्रमात भाजपचे देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाषणातून छाप पाडली असली तरी, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा या वेळी वानवा दिसून आला.
त्यामुळे कार्यक्रम शासकीय असला तरीही शिवसेनेचा बोलबाला दिसून येत असून भाजप आणि राष्ट्रवादी मात्र या कार्यक्रमाबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. (Shasan Aplya Dari Shinde Sena dominates program Combined flags of Shiv Sena NCP BJP seen in city maharashtra politics nashik)
दरम्यान, तीनच दिवसांपूर्वी धुळ्यामध्ये आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे झेंडे न लावल्याने अजित पवार यांनी भाषणात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शनिवारी नाशिक येथे झालेल्या या कार्यक्रमात ही चूक सुधारण्यात आली.
शहरातील विविध भागात शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपचे एकत्रित झेंडे फडकताना दिसत होते. तसेच तिन्ही पक्षाकडून बॅनरबाजीदेखील झाली. राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम दोन तारखा रद्द झाल्यानंतर अखेर शनिवारी (ता. १५) शहरातील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला.
त्यासाठी दोन दिवसांपासून शासनाकडून जय्यत तयारी सुरू होती. या तयारीत पालकमंत्री दादा भुसे आघाडीवर असल्याचे दिसून आले. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाची मेहनत घेत शहरभर बॅनर लावले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
भाजप व राष्ट्रवादीकडून बॅनर लावले होते. मात्र यात शिवसेना वरचढ असल्याचे दिसत आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार शपथविधीनंतर प्रथमच शहरात येत असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
त्यासाठी ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे होर्डिंग लावले होते. मात्र, यात भाजपचे मोजकेच होर्डिंग शहरात दिसून आले. शासकीय कार्यक्रम असला तरी यात, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्या तुलनेत भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संख्या कमी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.