female newspaper distributor.jpg 
नाशिक

एकवीस वर्षांपासून 'ती'ने सायकलवर वृत्तपत्र विक्री करुन उभा केला संसार...!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नाशिक रोड) आयुष्यात चूल आणि मूल हे स्वप्न, तर सर्वच महिला साकारतात. मात्र जिद्दीने वृत्तपत्रविक्रीचा यशस्वी व्यवसाय करून भाग्यश्री भारत माळवे यांनी आदर्श निर्माण केला आहे.

सायकलवर जाऊन करता वृत्तपत्र विक्री

भाग्यश्री 21 वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सायकलवर करीत आहे. सासू-सासरे, तीन मुले व पतीचा सांभाळ करतांना वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात भाग्यश्री माळवे यांचा कधीही खंड पडला नाही. जानोरी आंबे हे मूळगाव असणाऱ्या भाग्यश्री यांचे बालपण मेरी क्वॉर्टरर्समध्येच गेले. सीडीओ- मेरी हायस्कूलमध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर 1999 मध्ये भाग्यश्री यांचे लग्न झाले. भारत दत्तात्रय माळवे यांच्याशी विवाह झाल्यावर सासरे दत्तात्रय माळवे यांनी सुरू केलेला वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय भाग्यश्री यांच्या हातात सुपूर्द केला. बॅंकांचे डेली कलेक्‍शन करणाऱ्या पती भारत माळवे यांचा भाग्यश्री या आधार बनल्या आहेत. पहाटे तीनला उठून मुलांचा नाश्‍ता, शाळेचा डबा बनवून त्या पाचला सायकलवर वृत्तपत्र विक्रीला सुरवात करतात. नेहरूनगर, भीमनगर, जेल रोड परिसरात वृत्तपत्र विक्रीचे काम अजूनही त्या सायकलवरच करतात. 

गगनदीप सोसायटी, नेहरूनगर क्वॉर्टर येथे त्यांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. त्या वृत्तपत्र विक्रेत्या महिलांच्या आयडॉल म्हणून नाशिक रोड परिसरात चर्चिल्या जात आहेत, त्यांचा अनेक सामाजिक संस्थांनी गौरवही केला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

SCROLL FOR NEXT