Saptashrungi Devi Wani gad esakal
नाशिक

Navratri Festival: पदयात्रेकरू, कावडीधारकांसाठी निवारा शेड; सप्तशृंगी गडावर प्रशासन यंत्रणा सज्ज

सकाळ वृत्तसेवा

Navratri Festival : सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाची प्रशासकीय यंत्रणेसह ट्रस्ट व ग्रामपंचायतची तयारी पूर्ण झाली आहे.

भाविकांनी नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा करावा, असे आवाहन मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी केले. नवरात्रोत्सव व कावड यात्रेसाठी येणाऱ्या पदयात्रेकरू व कावडीधारकांसाठी दोन वॉटरप्रूप निवाराशेड प्रथमच ट्रस्टतर्फे उभारण्यात येणार आहेत. (Shelter shed for trekkers kavadi holders on saptashrungi devi gad nashik news)

सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवाबाबत कायदा व सुव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन नियोजन व आढावा, कार्यपूर्ती अहवाल पाहणीसाठी सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या चिंतन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

तहसीलदार रोहिदास वारूळे, कळवणचे गटविकास अधिकारी नीलेश पाटील, ट्रस्टच्या विश्वस्ता मनज्योत पाटील, ॲड. ललित निकम, कळवणचे पोलिस उपनिरीक्षक बबन पाटोळे, अभोण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे, नांदुरीचे उपनिरीक्षक कुलकर्णी, वनपरीक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, सुरेश बत्तासे आदी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी पाटोळे यांनी प्रशासनाच्या सर्व विभांगानी मागील आढावा बैठकीनुसार काय काय तयारी केली, याची माहिती जाणून घेतली.

बाकी असलेली कामे चोखपणे बजावण्याच्या सूचना दिल्या. यात प्रामुख्याने नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्त्यावर क्रेनची व्यवस्था, तात्पुरता बसस्थानकाचा मंडप वॉटरप्रूप असावा, गडावरील मोकाट जनावरे, डुकरांचा बंदोबस्त करावा, बीएसएनएल व वीज कंपनीने आपले सेवा अखंडितपणे सुरू ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. अन्न व औषध प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क यांना तहसीलदारांनी पत्र देऊन पथक तयार करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

अन्न व औषध विभागाकडून गडावरील विक्री होत असलेल्या अन्न पदार्थांची, तसेच प्रसादरूपाने देण्यात येणाऱ्या पदार्थांची प्राथमिक तपासणी करावी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने गडावर अवैध मद्य येऊ नये, यासाठी पथक स्थापन करून कारवाई करण्याचे आदेश दिले. वन विभाग, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, ट्रस्ट व आपत्ती व्यवस्थापन टीमने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

मागील वर्षी सातव्या माळेस भाविकांची झालेली मोठी गर्दी व त्यातच व्हीआयपी व त्यांच्यासोबत असलेल्या वाहानांच्या ताफ्यामुळे गडावर वाहतूक कोंडी झाल्याने भाविकांना तासन्‌तास ताटकळत राहावे लागले होते. यामुळे प्रशासनाविरुद्ध भाविकांनी रोष व्यक्त केला होता. त्यासारखे परिस्थिती उद्भवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी यावर काही निर्बंध लावण्याची मागणी ललित निकम यांनी केली.

गडावर स्थानिक व्यावसायिकांची मालवाहतुकीचे वाहने, दूध वाहने, स्कूल बस रोज वेगवेगळी येऊ शकतात. त्यांना प्रशासनाने पासची स्थानिक पातळीवर व्यवस्था करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, व्यावसायिक सुरेश बत्तासे यांनी केली. यावर निर्णय वरीष्ठ पातळीवरून घेण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

"चैत्रोत्सवात भाविकांना ट्रस्टतर्फे शिवालय तलाव परिसरात निवारा शेड उभारला होता. त्यास पदयात्रेकरू भाविकांना चांगल्या फायदा झाला. कावडयात्रेसाठी येणाऱ्या पदयात्रेकरू व कावडीधारकांसाठीही त्यास धर्तीवर सुमारे तीन हजार स्वेअर मीटरचे महिला व पुरुष भाविकांचे स्वतंत्र वॉटरप्रूप निवारा शेड देणगीदार व भाविकांच्या माध्यमातून उभारले जाणार आहे." -मनज्योत पाटील, विश्वस्त, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT