Shift of offices in Malegaon sparks controversy in central external targets MLA esakal
नाशिक

Nashik News: मालेगावातील कार्यालये स्थलांतरावरून मध्य-बाह्यमध्ये वादाची ठिणगी, आमदारांना लक्ष्य

प्रमोद सावंत

Nashik News : शहराचा विस्तार, लोकसंख्या, उद्योग, नागरी वसाहती या सर्वांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहर जिल्ह्याच्या उंबरठ्यावर असताना पूर्व भागातील घाण, केरकचरा, दुर्गंधी जैसे थे आहे.

गलिच्छ राजकारण व मानसिकता बदलण्यास कुणीही तयार नाही, याच मानसिकतेतून शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय स्थलांतरावरून मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघांचा रंग देत वाद निर्माण केला जात आहे.

राष्ट्रवादीने या वादातून आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना लक्ष्य केले आहे. रहिवासी वस्ती व यंत्रमाग या संमिश्र झोनमुळे मोठी किंमत मोजावी लागत आहे.

पूर्व भागात दिव्यांग, मुके, बहिऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. तरीदेखील यंत्रमाग शहराबाहेर स्थलांतर होत नाहीत. कार्यालय स्थलांतरामुळे नागरिकांची सोय झाली असतानाही राजकारण केले जात आहे. (Shift of offices in Malegaon sparks controversy in central external targets MLA Nashik News)

शहरातील कॅम्प रस्त्यावर मुद्रांक व नोंदणी विभागाचे कार्यालय रॉयल हब व्यापारी संकुलाच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर होते. येथे अनेक गैरसोयी होत्या.

तिन्ही कार्यालयांमुळे शहर व तालुक्यातील दस्तनोंदणी व खरेदी विक्रीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे कॅम्प रस्त्यावरील मोहन सिनेमागृह ते अपर जिल्हाधिकारी कार्यालय भाग जणू काही पार्किंगचा झाला होता.

रॉयल हब व्यापारी संकुलाला दोहोबाजूने पार्किंगच्या वाहनांचा सतत वेढा असतो. यामुळे येथील दोन कार्यालये सटाणा रस्त्यावरील यशश्री कंम्पाऊंडसमोरील मीरा इन्क्लेव्ह येथे प्रशस्त जागेत स्थलांतरित झाले. येथे दिव्यांगांना व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह व सर्व सोयी सुविधा आहेत.

मुद्रांक व नोंदणी कार्यालयाच्या स्थलांतराचे निमित्त करून राजकारण सुरू झाले. मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेडचे (एमपीएसएल) कार्यालयदेखील साठफुटी रस्त्यावरील स्केअर व्यापारी संकुलात स्थलांतरित झाले.

यापूर्वी जुन्या महामार्गावरील उपकार सिनेमाजवळ ते होते. वीज वितरण विरोधातील सततच्या आंदोलनामुळे जुना महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी व्हायची. स्थलांतरामुळे ती दूर झाली. बाजार समिती आवारात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय होते.

तेथे स्वच्छतागृह, शौचालय, वाहनांच्या चाचणीसाठी ट्रक अशा कुठल्याही सुविधा नव्हत्या. टेहरे शिवारात तब्बल पाच कोटी रुपये खर्चातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची सर्व सोयीसुविधांयुक्त कार्यालय साकारले.

हे कार्यालय शहरापासून पाच किलोमीटरवर आहे. येथे अवजड वाहनांसाठी चाचणीचा ट्रॅकही झाला. मध्य व बाह्य अशा दोन्ही मतदार संघातील नागरिकांची सोय झाली आहे.

याच कार्यालयांच्या स्थलांतराचे निमित्त करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष एजाज उमर यांनी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘नवीन कार्यालये आणू नका, पण शहरातील कार्यालये तरी स्थलांतरित होऊ देऊ नका’ अशी टिका त्यांनी केली. यापूर्वी मालमत्ता

सर्वेक्षणावरूनही पूर्व-पश्‍चिम वाद उफाळून आला होता. शहराचा विस्तार व प्रस्तावित जिल्हा पाहता कार्यालय स्थलांतर काळाची गरज आहे.

तरीही प्रत्येक बाबीत राजकारण करणार नाही तर येथील राजकारणाचा वेगळा पोत टिकून कसा राहणार? यातूनच ‘मिळाला मुद्दा की कर एकमेकांवर टिका’ हा येथील खाक्या झाल्याने शहरवासीयांचे मात्र नुकसान होत आहे. विकासकामांना खीळ बसत आहे हे नेत्यांनी ध्यानात घ्यायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT