Statement of the demand to withdraw the excessive increase, Commissioner Dr. A delegation of the Shinde group while giving Chandrakant Pulkundwar. esakal
नाशिक

Nashik Political News: शिंदे गटाचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या दारी; अवाजवी मालमत्ता कर कमी करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नाशिककरांवर लादलेला अवाजवी मालमत्ता कर पूर्वीप्रमाणेच करावा. तसेच भाडे तत्त्वावरील मालमत्तांवर आकारला जाणारा तिप्पट कर मागे घ्यावा, या मागणीसाठी शिंदे गटाचे शिष्टमंडळ आज आयुक्तांच्या दारी पोचले. गेल्या आठवड्यात शिंदे गटात सहभागी झालेले माजी नगरसेवक महापालिका संदर्भातील प्रश्नांसंदर्भात ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. (Shinde group delegation to nmc Commissioner Demands to reduce exorbitant property taxes Nashik Political News)

मंगळवारी (ता.२०) महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नाशिककरांवर लादलेली करवाढ आयुक्तांच्या अधिकारात मागे घ्यावी, अशी आग्रही मागणी केली. महापालिकेने यापूर्वी कर रचना करताना निवासी, बिगर निवासी व वाणिज्य अशी त्रिस्तरीय रचना केली होती. मात्र २०१७ व १८ मध्ये तत्कालीन आयुक्त मुंडे यांनी करवाढ करण्याचा निर्णय घेताना अवाजवी पद्धतीने कर आकारणी केली.

त्यातही बिगर निवासी ही कॅटेगरी रद्द करून फक्त निवासी व बिगर निवासी असे दोनच कर प्रकार ठेवले. बिगर निवासी प्रकारात व्यावसायिक पद्धतीने कर लागू केले. २०१८ पूर्वी चार रुपये ९५ पैसे प्रतिचौरस मिटर असा कराचा दर होता. मुंडे यांनी यात तब्बल नऊपटीने वाढ करताना ४४ रुपये प्रतिचौरस मीटर असा केला. त्याचबरोबर भाडेतत्त्वावर मालमत्ता वापरण्यास दिल्यास त्यावर तिप्पट दर आकारला. अनिवासी वापरातील मूल्यांकन दर ७९. २० रुपये प्रतिचौरस मीटर असा आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

जर सदर मिळकत भाडेतत्त्वावर दिल्यास तिप्पट कर आकारणी म्हणजे २३७. ६० रुपये प्रतिचौरस मीटर असा अवास्तव मालमत्ता कर लागू केला. यासंदर्भात महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठवत कर रद्द करण्याची मागणी करताना प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला. मात्र, मुंडे यांनी सदरचा प्रस्ताव शासनाकडे विखंडित करण्यासाठी न पाठवता दप्तरी दाखल केला. गेल्या अनेक वर्षांपासून कराचे दर कमी करण्याची मागणी होत आहे.

त्या अनुषंगाने शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या अधिकारात कर कमी करण्याची मागणी केली. शिंदे गटाचे व माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, सचिन भोसले, प्रताप मेहरोलिया, सुदाम ढेमसे, पुनम मोगरे, ज्योती खोले, संगीता जाधव, चंद्रकांत खाडे, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, जयश्री खर्जुल, सुवर्णा मटाले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरेंनी लाज राखली ;वरळीचा गड राखला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: फुलंब्री विधानसभा संघात अनुराधा चव्हाण 28900 मताने आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT