नाशिक : सिन्नर-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातग्रस्तांवर उपचाराचा खर्च राज्य शासन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात निधी उपलब्धतेची अडचण उद्भवत असल्याचे निदर्शनात आले होते.
या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी थेट मंत्रालयात संपर्क साधत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना अखंडित आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होऊ शकेल. (Shirdi Accident Case Follow up by District Officer directly to Ministry nashik news)
खासगी निमआराम बस व ट्रक यांच्यातील झालेल्या यांच्यातील झालेल्या अपघातात बसगाडीतील प्रवाशी जखमी झाले होते. सिन्नर व परिसरातील रुग्णालयात या जखमींना दाखल करण्यात आले होते.
काही जखमींना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आलेले असल्याने त्यांच्यावर जलदगतीने उपचार होणे आवश्यक होते. या पार्श्वभुमीवर आर्थिक अडचणीमुळे उपचार प्रभावित होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला आहे. लवकरच हा प्रश्न सोडविला जाणार असल्याचे वरीष्ठ स्तरावरुन सांगण्यात आलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.