Shiv Jayanti 2023 esakal
नाशिक

Shiv Jayanti 2023 : शिवजन्मोत्सवात शहरात डीजे वाजणार!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मोत्सव हा केवळ नाशिकचा नव्हे तर देशाचा उत्सव आहे. नाशिकच्या जन्मोत्सवात अनेक चांगले पायंडे पाडण्यासह नवनव्या संकल्पना राज्यात रुजविल्या आहेत. (shiv jayanti 2023 DJ will play in the city during Shivjanmotsav nashik news)

शिव जन्मोत्सव हा सगळ्यांचा असल्याने त्यांना शिवप्रेमीच्या उत्साहाला मुरुड घातली जाणार नाही. अशा शब्दात पालकमंत्री दादा भुसे यांनी शिवप्रेमी मंडळाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देतांना मूक संमती दर्शविली. मात्र न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचेही आवाहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिवजन्मोत्सवाची बैठक झाली. त्यात अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या.

खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त पौर्णिमा चौगुले आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्री. भुसे म्हणाले की, शिवजन्मोत्सवानिमित्ताने पालखी काढण्यासारख्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या प्रथा परंपरांत अडचण येण्याचे कारण नाही.

डीजे. वाजविण्याबाबत न्यायालयाच्या आदेशांचे पालन व्हावे. मिरवणूक मार्गावर पाणी विजेची सोय केली जावी, अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. शिवजन्मोत्सव सगळ्यांचा आहे. त्यामुळे उत्सवात शांतता सौहार्द जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

त्यामुळे प्रशासनाशिवाय मंडळाच्या स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने त्यात योगदान द्यावे. परवानग्यांसाठी कार्यकर्त्यांची वणवण होणार नाही. त्यांची अडवणूक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. रात्री बारापर्यत उत्सवाला परवानगी असेल, असेही श्री. भुसे यांनी स्पष्ट केले.

पालखी अन्‌ ड्रोणला परवानगी द्या

पोलिस आयुक्त शिंदे यांनी शहरात नाशिकला सहा आणि नाशिक रोड सहा अशा बारा चित्ररथांनी परवानगी मागितली आहे. या शिवाय शहरात ३५० ठिकाणी शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमांच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत.

मंडळाकडून प्रतिमापूजनाचे कार्यक्रम होणार आहेत. मिरवणुकीची पूर्वतयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. तत्पूर्वी भगवंत पाठक, मामा राजवाडे, कैलास बारवकर, योगेश कापसे, देवेंद्र पाटील, योगेश गांगुर्डे, संदीप लभडे, कैलास देशमुख आदींनी सूचना मांडल्या.

शिवप्रेमीच्या मागण्या

- छत्रपती शिवजन्मोत्सवाची पालखी निघणार
- शिवजन्मोत्सवासाठी ड्रोणला परवानगी द्या
- जागेवर उत्सवासाठी डीजे वाजवू द्यावा
- परवानग्यांसाठी अडवणुकांना पायबंद घाला
- उत्सवासाठी भाडे, शुल्क कपात केली जावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT