Nashik Road Shivjayanti esakal
नाशिक

Shiv Jayanti 2023 : शिवजन्मोत्सवाचा ‘नाशिकरोड पॅटर्न’ राज्यात हीट! सर्वपक्षीय नेत्यांची एकता

यंदाही मिळणार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा

नाशिकरोड : सहा वर्षापासून राज्यात एक आदर्श ठरणारा सर्वपक्षीय, सर्व धर्मीय शिवजन्मोत्सव समितीचा नाशिक रोड पॅटर्न राज्यात हीट होत आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर सर्वपक्षीय लोक शिवजन्मोत्सव समितीच्या निमित्ताने एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मता दाखवत आहे.

सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव पॅटर्न राज्यभर ठिकठिकाणी राबविला जात आहे. (Shiv Jayanti 2023 Nashik Road Pattern of Shiv Janmotsav most famous state Unity of all party leaders nashik news)

सहा वर्षांपूर्वी सर्वप्रथम नाशिक रोडला सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव समिती स्थापन झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, मनसे, शिवसेना व इतर पक्ष संघटनांच्या नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्ष विरहित सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे ठरवले.

त्यानंतर महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या ठिकाणी नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचा हा आदर्श पॅटर्न घेऊन शिवप्रेमींनी सर्वपक्षीय शिवजयंती साजरी करायला सुरवात केली. नाशिकरोडला निर्माण झालेला हा आदर्श पॅटर्न गेल्या अनेक दिवसापासून राज्यभर अमलात आणला जात आहे.

यातून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक दिसत असून एकाच परिसरातील वेगवेगळ्या पक्षांच्या शिवजयंती समित्या सामंजस्याने एकाच छताखाली आणल्या गेल्या आहे.

मोठ्या जल्लोषात नाशिक रोडला शिवजयंती साजरी केली जाते. मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी शिवजन्मोत्सव समिती दरवर्षी निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवते. यंदाही नाशिककरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

यातून प्रबोधन मनोरंजनासह संस्कृतीची जोपासना होत आहे. नाशिक रोडचा हा आदर्श पॅटर्न सध्या सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुण्यात पाहायला मिळत आहे. दरवर्षी शिवजन्मोत्सव समितीच्या निमित्ताने राज्यभर नाशिकरोड पॅटर्नची चर्चा होत असते.

दरवर्षीप्रमाणेच होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची तयारी मोठ्या दिमाखात सुरू असून अध्यक्ष श्रीकृष्णा लवटे, कार्याध्यक्ष शांताराम घंटे, उपाध्यक्ष राहुल वाजे, लकी ढोकणे, सरचिटणीस प्रशांत आवारे, चिटणीस सागर भोर, खजिनदार रवींद्र कडजेकर यांच्यासह पदाधिकारी काम पाहत आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

"यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आलेली आहे. शिवप्रेमी हा उत्सव साजरा करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहे. यंदा पारंपारिक वाद्यांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. रक्तदान शिबिरात सहभाग घेण्यासाठी लोकांना आवाहन करण्यात येत आहे"

- श्रीकृष्णा लवटे, अध्यक्ष, नाशिकरोड शिवजन्मोत्सव समिती

"देखावा साकारण्याचे काम सुरू करणार आहे. दरवर्षीप्रमाणेच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. सर्वपक्षीय शिवजन्मोत्सवाची संकल्पना अनेक ठिकाणी अमलात आल्याचा आनंद आहे. नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जेलरोड येथील छत्रपती चौकात सुशोभीकरण सुरू आहे." - शांताराम घंटे, कार्याध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT