young devotee wearing a forehead tila with joy in the city of Mahakal esakal
नाशिक

Nashik News : शिवपुराण कथा सोहळा; भक्तीमय वातावरणातून पालटला मालेगावचा नूर!

राजेंद्र दिघे

मालेगाव शहर (जि. नाशिक) : श्री शिव महापुराण कथा श्रवणासाठी रोजच लाखोंच्या संख्येने भाविक शहरात दाखल होत आहेत. भव्य मंडपाबाहेर भक्तीचा मधूर नाद, चंदनाचा सुगंध दरवळावा अशा भक्तीमय वातावरणात मालेगाव शहर महाकालमय झाले आहे. देशभरातील भाविकांच्या आगमनामुळे खाद्य पदार्थांसह विविध वस्तूंचे जवळपास शंभरहून अधिक स्टॉल असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. साधारण पंधरा लाखांपेक्षा अधिक उलाढाल या माध्यमातून होत असल्याचा अंदाज आहे. अनेकांना रोजगार मिळाला असुन, रिक्षा चालकांचाही व्यवसाय तेजीत आहे. (Shiv Puran katha festival devotional atmosphere at Malegaon Nashik News nashik news)

स्टॉलवर गर्दी.

शहरात हिंदू- मुस्लिमांसह सर्वच धर्मांचे लोक एकत्र नांदतात. बॉम्बस्फोट व दंगली यामुळे देशभरात कुप्रसिद्धीस आलेल्या या शहरात हिंदू आणि मुस्लिम बांधव हातात हात घालून एकात्मतेचे गीत गात आहेत. अतिशय सुक्ष्म नियोजन, ना कोणी लहान- ना मोठा, कुठल्याही प्रकारचा बडेजाव न मिरवता सहजपणे मालेगावकर या शिवनगरीत रममाण झाले आहेत. अवघ्या काही दिवसांत व्यापक नियोजन आयोजन समितीने केले.

आलेल्या भाविकांमुळे मालेगावकर सध्या ‘साधू संत येती घरा..’चा आनंद घेत आहेत. विविध सामाजिक धार्मिक संस्था व कार्यकर्ते, समाजाची मंडळे, पदाधिकारी अतिथींचे स्वागत करून शिस्तबद्ध पद्धतीने महाकालनगरीचा मार्ग दाखवत आहेत. विशेष म्हणजे मध्यरात्री बारापर्यंत महिला भाविक भजनात दंग होऊन थिरकताना दिसत आहेत. हा एक अत्यंत सकारात्मक बदल म्हणावा लागेल.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली जागा, चोहीबाजूने येणाऱ्या वाहतूकीचे नियोजन, पार्किंगची व्यवस्था, तीन हजार स्वंयसेवक, पोलिस यंत्रणा, आरोग्य विषयक मूलभूत सुविधा, निवासाची, खाण-पान व्यवस्था चोखपणे केली आहे. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था असल्याने अतिथींच्या तोंडूनही मालेगावचे नाव सर्वदूर पोचणार असून, बदलत्या मालेगावची वेगळी ओळख जगासमोर येणार आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

"आचार्य प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराणाच्या माध्यमातून सर्वसामान्य भाविकांसाठी भक्तीचा जागर अद्‌भुत आहे. हजारोंच्या संख्येने भाविक मुक्कामी असल्याने अखंड उमंग व उत्साहाचे वातावरण आहे. शंभरावर स्टॉलच्या माध्यमातून प्रत्येकी दहा ते बारा हजारांची रोजची उलाढाल होत आहे." -मिनाक्षी हिरे, डायमंड फुडस स्टॉल.

"मालेगावसारख्या शहरात शिवमहापुराण कथा महोत्सव आमच्यासाठी आनंदमय ठरली. सुंदर नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम सुरू आहे. तमाम मालेगावकरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे." -भाऊसाहेब खैरनार, टिटाणे, ता. साक्री

"मालेगाव नगरी महाकालमय झाली असून, मध्यप्रदेश, गुजरात येथील अनेक भाविक आले आहेत. प्रत्येक भाविकांच्या कपाळी गंध लावण्याचा वेगळाच आनंद मिळतो. मोठ्या भक्तिभावाने प्रत्येक जण टिळा लावून घेत आहे."- रामकिसन महाराज, टिळा लावणारे, सिहोर (भोपाल).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT