नाशिक : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयामुळे नाशिक शहरात शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट प्रथमच काँग्रेसच्या दारात उत्सव साजरा करताना दिसला.
महाविकास आघाडीने ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. (Shiv Sena at Congress with Kasaba Bypoll Election victory Mahavikas Aghadi celebration in front of Congress Bhavan nashik political news)
२८ वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आज काँग्रेसचे उमेदवार विजय झाले. या विजयाने महाविकास आघाडीत जान फुंकली गेली. महाविकास आघाडीच्या अनुषंगाने विचार करता नाशिकमध्ये सर्व पक्ष आज एकत्र आले.
महात्मा गांधी रस्त्यावर काँग्रेस भवनासमोर काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील पोहोचले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात सहभाग घेतला.
आतापर्यंत शिवसेनेने काँग्रेसच्या दारात कधीच प्रवेश केलेला नाही. यापूर्वी शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. शिवसेनेकडे एकेकाळी कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. त्यामुळे शिवसैनिकांनी काँग्रेस भवनवर हल्ला केला.
त्या व्यतिरिक्त काँग्रेस व शिवसेनेचा कधी एकमेकांच्या कार्यालयाशी संबंध आला नाही. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. असली तरी हेच चित्र कायम होते. मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्ताने हे चित्र आज बदलल्याचे दिसून आले.
काँग्रेसच्या जल्लोषात महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेसह राष्ट्रवादीने देखील सहभाग घेतला. काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड आकाश छाजेड, वत्सला खैरे, आशा तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल, माजी महापौर वसंत गिते, सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, दत्तात्रय सूर्यवंशी, सचिन मराठे आदी पदाधिकारी विजयाच्या जल्लोषात सहभागी झाले.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
काँग्रेसमधील गटबाजी कायम
काँग्रेसकडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला असला तरी या जल्लोषातही दोन गट दिसून आले. काँग्रेसच्या नाराज गटाकडून रेड क्रॉस येथील आंबेडकर कॉलनी समोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्ते डॉ. हेमलता पाटील, राजेंद्र बागूल, बबलू खैरे, ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, विजय पाटील, कैलास कडलग, तसेच मागासवर्गीय विभागाचे सरचिटणीस सुरेश मारू, स्वप्नील पाटील, जितू मारू, जयेश पोकळे, देवेन मारू, रतीश मारू, रमेश मकवाना आदींनी जल्लोष साजरा केला. दुसरीकडे काँग्रेस भवनसमोर ॲड. आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला. शिवजयंती देखील दोनदा याच गटाकडून साजरी करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.