Shiv sena BJP corporates Sakal
नाशिक

एका कामाचे होणार दोनदा भूमिपूजन; सेना-भाजपमध्ये राड्याची शक्यता

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : शिवसेना नगरसेविका हर्षदा गायकर यांनी नगरसेवक निधीतून प्रभागात एक रुपया जरी कामासाठी खर्च केले असेल तर आपण पाहिजे ते बक्षीस देऊ अशा प्रकारचे आव्हानात्मक विधान भाजप नगरसेविका अलका अहिरे यांनी केल्याने शुक्रवारी महापौर व आमदारांच्या हस्ते होणाऱ्या गार्डन कामाच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना व भाजपमध्ये राडा होण्याची चिन्हे आहेत. तसेच, भूमिपूजन कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी ची ठोस भूमिका प्रभाग २६ च्या शिवसेना नगरसेविका हर्षदा गायकर यांनी घेतली आहे. त्यामुळे होणारा संघर्ष अटळ आहे.

नाशिक महापालिका निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना आता प्रभागातील विकासकामांच्या श्रेयावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये वाद जुंपल्याचा काहीसा प्रकार प्रभाग २६ मध्ये घडला आहे. एकाच कामाचे दोन वेळेस भूमिपूजन होत असल्याचा विचित्र प्रकार यानिमित्ताने नागरिकांना बघायला मिळत आहे. २५ ऑगस्टला शिवसेना नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या हस्ते शाहाजी राजे गार्डन, जनक नगरी येथे स्थानिक नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. आता त्याच कामाचे भूमिपूजन शुक्रवारी महापौर व आमदारांच्या हस्ते होणार आहे.


शिवसेनेच्या नगरसेविकेने अद्यापपर्यंत नगरसेवक निधीतून एकही रुपया विकास कामांसाठी खर्च केलेला नाही तसे काम त्यांनी दाखवून दिले तर पाहिजे ते बक्षीस आपण देऊ. महापालिकेत आमच्या भाजपची सत्ता आहे त्यामुळे आम्ही आम्ही मंजूर करून आणतो आणि त्याचे श्रेय घेण्याचे काम येथील नगरसेविका नेहमी घेतात हा प्रकार योग्य नाही.
- अलका अहिरे , नगरसेविका, भाजपा, प्रभाग क्रमांक २६



मी गेल्या अनेक वर्षा पासून पाठपुरवठा करून या कामाला यश मिळावले. २१-०१-२०२० रोजी महापालिका अंदाज पत्रकात तरदूत व्हावी यासाठी पत्र व्यवहार वरून सातत्याने पाठपुरवठा सुरु होता. त्या अनुषंगाने २५-६-२०२० पासून हि फाईल पुढे सरकवण्यात आली. आज रोजी त्या कामाचे भूमीपूजन पार पडले. लवकरच त्या गार्डनचे सुशोभीकरनाचे काम पार पडेल. नागरिकांसाठी खुले करण्यात येईल. एखाद्या कामाचा पाठपुरावा आम्ही करायचा आणि काम जवळ आले की दुसऱ्याने पत्र द्यायचे आणि श्रेय घ्यायचे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
- हर्षदा गायकर, उपजिल्हाधिकारी युवती सेना व नगरसेविका, शिवसेना, प्रभाग क्रमांक २६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT