During the meeting of NCP President Sharad Pawar, Shiv Sena Uddhav Thackeray Group's Datta Gaikwad, Vijay Karanjkar, Sudhakar Badgujar, Sunil Bagul, Vasant Gite, Vinayak Pandey, D. G. Suryavanshi esakal
नाशिक

Mahavikas Aghadi News: शिवसेनेचे नेते शरद पवारांच्या भेटीला; महाविकास आघाडीत नाशिक, दिंडोरीच्या जागेबाबत चर्चा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : निर्यातबंदीविरोधात शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्यांनी भेट घेतली. नाशिक व दिंडोरी लोकसभेबाबत उभयतांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.

पवार व सेना नेत्यांच्या भेटीने महाविकास आघाडीची नाळ अधिक घट्ट बांधली जात असल्याचे दिसून आले. (Shiv Sena leader meets Sharad Pawar Discussion regarding Nashik Dindori site in Mahavikas Aghadi political)

येत्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यादृष्टीने आतापासूनच रणनीती आखली जात आहे. महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या गटाकडे नाशिक लोकसभेची जागा दिसून येते.

राष्ट्रवादी (शरद पवार गटा)कडे दिंडोरीची जागा आहे. अद्याप जागावाटप झालेले नसले तरी महाविकास आघाडीचा धर्म म्हणून शिवसेनेच्या नेत्यांनी सोमवारी शरद पवारांची भेट घेतली.

त्यांचे नाशिकमध्ये स्वागत केले. शहरातील राजकीय परिस्थिती, ग्रामीण भागातील वातावरण याविषयी गप्पा मारत त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये काय ‘ट्रेंड’ असेल याचीही माहिती जाणून घेतली.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील मतांची आघाडी-८४१ आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT