संजय राऊत  Sakal
नाशिक

नाशिक महापालिकेची सत्ता शिवसेना घेणारच! ; खासदार संजय राऊत

: शिवसेनेतर्फे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शाखा-बुथप्रमुख संवाद कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई ठाण्याप्रमाणे नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आजही आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेची सत्ता शिवसेना घेणारच पण नाशिक शहरात शिवसेनेचा एकही आमदार नाही, याची खंत प्रत्येक शिवसैनिकांनी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात शनिवारी (ता.२३) शिवसेनेतर्फे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख- बुथप्रमुख संवादाचा कार्यक्रम झाला. त्यात खासदार राऊत बोलत होते. कृषीमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, आमदार नरेंद्र दराडे, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, गटनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, योगेश घोलप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले की आम्ही कोणत्याही आघाडीत असू आम्ही हिंदुत्वाचा विचार सोडणार नाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकला जे पेरले तेच उगवले नाशिक शिवसेनेची प्रयोगशाळा आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेत साडेसातशे कोटींचा गैरव्यवहार आहे. नाशिक महापालिकेतील स्मार्ट सिटीतील घोटाळे बाहेर काढा, असे आवाहनही त्यांनी केले.

महापालिकेवर भगवाच फडकणार : भुसे

कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले की, सभागृहातील गर्दी पाहिल्यावर महापालिकेवर भगवा फडकविण्यात यश येईल. मुंबई ठाण्यानंतर नाशिकला शिवसेनेची सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करू. कोरोनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू आहे. नाशिकचे पदाधिकारी नाशिक महापालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणाले.शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी प्रास्ताविक सांगितले, की डिसेंबरला पद मिळाल्यापासून १२२ शाखा स्थापन केल्या. कोरोना काळात ६५ बेडचे रुग्णालय उभारले. ४५ शिबिरात २३४१ रक्तबाटल्या संकलन केले. रोज संघटनेसाठी ३ तास काम करतो, असे सांगितले. श्री. गीते यांनी महापालिकेत ३३ कोटींची स्वच्छता मशिन आणण्याचे प्रयत्न असून ते थांबवावे, असे आवाहन केले. श्री करंजकर यांनी जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिकेवर भगवा फडकवू असे सांगितले.

१०० कोटी लस टोचल्याचा दावा खोटा

खासदार राऊत पुढे म्हणाले १०० कोटी लस टोचल्याचा दावा खोटा आहे, फक्त २३ कोटी लस टोचल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अंमली पदार्थांच्या निमित्ताने महाराष्ट्र बदनाम केला जात आहे. शिवसेनेच्या पक्ष विस्ताराचे काम सुरु असून प्रत्येक कार्यक्रमात महिलांची संख्या जास्त आहे, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता लक्षात येते. भाजपच्या १७ ते १८ जणांनी विचारणा केली. यापुढे महाराष्ट्रात राजकीय क्षितिजावर शिवसेनेचा सूर्य तळपत राहील. २८ तारखेला या सरकारला २ वर्ष होतील. आणखी ३ वर्षपण जातील आणि पुढील पाच वर्षे पण आमचेच असतील, हिम्मत असेल तर हटवून दाखवा, असे आव्हान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT