Shivai Spice Farmer Producer women company created its own brand in spice production nashik news esakal
नाशिक

Success Story : बचतगटाची झाली आता कंपनी; 21 प्रकारच्या मसाल्याचा राज्यभरात डंका...!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बचतगट चळवळीने महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मिळवून दिला आहे. प्रारंभी स्वतःच्या बचतीला प्राधान्य देत त्यांनी पत निर्माण केली. सामुहिक उद्योगातून उत्पादन सुरू केले. बचतगटाचे रूपांतर आता थेट कंपनीत झाले आहे. (Shivai Spice Farmer Producer women company created its own brand in spice production nashik news)

येथील श्री शिवाई मसाले फार्मर प्रोड्युसर या महिलाच्या कंपनीने मसाले उत्पादनात स्वताचा ब्रॅण्ड निर्माण केला आहे. पंचवीस प्रकारच्या मसाल्याची चव राज्यभरात पोहचत आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत सव्वा दोन कोटी रूपयांचे अर्थसहाय्य या गटाला मंजूर झाले आहे. भारती मोरे, भारती लोहिते यासह दहा महिला संचालिका असलेल्या शिवाई मसाले कंपनीची यशोगाथा इतर महिलांना प्रेरणादायी ठरते.

बचतगटाची चळवळ आता सर्वत्र रूजते आहे. पिंपळगावच्या महिलांनी बचतगटाच्या चळवळीला आपलेसे केले. पण त्यात शिवाईच्या महिलांनी एक पाऊल अधिक दमदारपणे पुढे टाकले आहे. दीड हजार महिलांना संघटित करून त्यांना रोजगार मिळवून देत प्रमुख मसाले उत्पादना बरोबरच इतर पदार्थाची निर्मिती करत थेट महिलांची फार्मर प्रोड्युसर कंपनीची २०१९ मध्ये मुहूर्तमेढ रोवली.

परिसरातील महिलांचे सबलीकरण होण्यासाठी त्यांचे प्रबोधन करून त्यांच्या हाताला काम दिले. काही महिला शेतकऱ्याकडून त्यांच्या शेतात पिकणारा कांदा, हळद, धने, मिरची विकत घेत कंपनीच्या संचालिका व सदस्यांनी ‘मिळून साऱ्या जणी’ अशी सक्षमीकरणाची वज्रमूठ आवळली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पंचवीस प्रकारचे मसाले

शिवाईचे गरम मसाला, मटन मसाला, कांदा पावडर, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, पनीर मसाला यासह पंचवीस प्रकारच्या मसाल्याच्या चवीची महाराष्ट्राला भुरळ पडली आहे.

वर्षभरात पाचशे किलो मसाल्याची विक्री झाली आहे. पुणे, नांदेड, नाशिक, सिल्लोड येथे झालेल्या कृषी महोत्सवात शिवाई महिला फार्मर कंपनीच्या दालनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मसाल्या बरोबरच शिवाई कंपनी दिवाळी फराळा उत्पादनाचे काम करतात.

केंद्राचे सव्वा दोन कोटी सहाय्य

शिवाईची उलाढाल वाढू लागल्याने प्रशस्त जागेत कंपनी उभारावी, असा विचार पुढे आला. त्यासाठी केंद्राच्या स्मार्ट ग्राम परिवर्तन योजनेत सहभाग घेऊन अर्थसहाय्य मिळविण्याचा निर्णय झाला. प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर स्मार्ट अंतर्गत सव्वा दोन कोटी रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे.

त्यातील एक कोटी २७ लाख रूपये सवलत केंद्र शासनाकडून मिळणार आहे. वरखेडा येथे दोन एकर जागा भाडेतत्त्वावर घेऊन लवकरच तेथे कंपनी उभारली जाणार आहे. परदेशी तंत्रज्ञानाच्या यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून शिवाईच्या या ड्रिम प्रोजेक्टला लवकच प्रारंभ होत आहे.

कंपनीचे भागभांडवल ३१ लाख

बचतीची गुरूकिल्ली महिलांकडे असते याचा प्रत्यय शिवाईच्या आर्थिक स्थितीकडे नजर टाकल्यावर येतो. ३१ लाख रूपये भागभांडवल शिवाई कंपनीकडे आहे. गरजवंत महिलांना मदतीचा हात दिला जातो.

स्वावलंबी होण्याबरोबरच बचतीचे प्रशिक्षण दिले जाते. दहा एकर क्षेत्रात निर्यात होणाऱ्या मिरचीचे उत्पादन घेतले आहे. इतर महिलासाठी शिवाईचे कार्य प्रेरणादायी ठरते. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवाईच्या उत्पादनाचे विशेष कौतुक केले आहे. तुळजा भवानी पतसंस्थेचे अध्यक्ष सुहास मोरे यांचे शिवाई कंपनीला विशेष मागदर्शन असते.

शिवाईच्या संचालिका

भारती मोरे (अध्यक्ष), भारती लोहिते (सचिव), मीना वाटपाडे (उपाध्यक्ष), संचालिका ः राधिका गायकवाड, सुमन साळुंखे, ज्योती शिरसाठ, मनीषा शिरसाठ, स्वाती मोरे, छाया पोटे.

"घरात अन शेतात महिला अधिक प्रमाणात कष्ट उपसतात. पण आर्थिक नियोजनाचे स्वातंत्र्य त्यांना नाही. महिलाच्या पंखात बळ भरण्यासाठी शिवाईची स्थापना केली. लवकरच शिवाईच्या मसाल्याचे उत्पादन प्रशस्त जागेत होईल. शिवाई कंपनीशी जोडल्या गेलेल्या महिलाचे आर्थिक सक्षमीकरणासाठी आमची धडपड आहे." - भारती मोरे, अध्यक्ष, शिवाई मसाले फार्मर प्रोडयुसर कंपनी, पिंपळगाव बसवंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT