Jalyukta Shivar Yojana esakal
नाशिक

Jalyukt Shivar Yojana : जलयुक्त शिवारच्या 210 गावांमध्ये उद्यापासून शिवारफेरी; वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार २ योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी असलेले वेळापत्रक जाहीर झाले असून, त्यानुसार सोमवार (ता. २४)पासून शिवारफेरीला सुरवात करायची असून, ८ जूनपर्यंत सर्व कामांचे निविदाप्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. (Shivar Pheri from tomorrow in 210 villages of Jalyukta Shivar 2 scheme nashik news)

जिल्ह्यातील २१० गावांमध्ये जलयुक्त शिवार २ योजनेच्या शिवारफेरीचे काम सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागामार्फत ही योजना राबविली जाणार आहे.

राज्यात भाजपच्या सहभागाचे सरकार पुन्हा आल्यानंतर जलयुक्त शिवाय अभियान २ ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू करण्यात आली आहे. त्यात गावातील पाण्याचा ताळेबंद करून त्यानुसार मृद व जलसंधारण, पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध करणे, पाण्याचा अतिवापर झालेल्या भागात भूजलपातळी वाढवणे ही कामे केली जाणार आहेत.

यासाठी भूजलपातळी व अवर्षणग्रस्त भाग या निकषांवर गावांची निवड केली जाणार आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्हाधिकारी यांनी या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यात २१० गावांची निवड केली आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आता सर्व जलसंधारण उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना पत्र पाठवून जलयुक्त शिवार योजना अंमलबजावणीचे वेळापत्रक दिले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या पत्रानुसार सर्व संबंधित समिती सदस्यांनी २४ ते २७ एप्रिल या काळात त्यांच्या तालुक्यातील निवड झालेल्या गावांमध्ये शिवारफेरी करायची आहे. शिवारफेरी पूर्ण झाल्यानंतर २८ एप्रिल ते ३ मे या काळात गाव आराखडा तयार करणे, गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करून त्याला ग्रामसभेची मान्यता घेणे ही कामे पूर्ण करायची आहेत.

ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर तालुकास्तरीय समितीने ४ ते ७ मे या काळात गाव आराखड्यांना मान्यता देऊन ते प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवायचे आहे. जिल्हा समितीने ८ ते १० मे या काळात या आराखड्यांना मान्यता दिल्यानंतर जलसंधारण विभागाने ११ ते १७ मेपर्यंत या सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करून त्यांना १८ ते २५ मे या काळात तांत्रिक मान्यता द्यायच्या आहेत.

कामांना तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर २६ ते २९ मेपर्यंत या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करावयाच्या आहेत. यानंतर जलसंधारण विभागाने ३० मे ते ५ जून या काळात निविदा प्रसिद्ध करायचे आहेत. या टेंडरची स्वीकृती मुदत ६ ते ८ जून अशी असणार आहे.

२० हजार ५४४ गावांमध्ये जलसंधारणाची कामे

राज्य सरकारने २०१५ ते २०१९ या काळात जलयुक्त शिवार योजनेतून २२ हजार ५९३ गावांमध्ये मृद व जलसंधारणाची सहा लाख ३२ हजार ८९६ कामे करून २० हजार ५४४ गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत. या कामांमुळे २७ लाख टीसीएम पाणीसाठवण क्षमता निर्माण करण्यात आल्या. यामुळे ही योजनेतून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT