Ajay Boraste sakal
नाशिक

भाजपच्या हतबलतेतून नाशिककरांचा विश्‍वासघात; अजय बोरस्ते यांचा आरोप

विक्रात मते

नाशिक : महापालिकेतील भाजपच्या सत्तेला साडेचार वर्षे उलटल्यानंतर प्रशासन ऐकत नसल्याची उपरती महापौर सतीश कुलकर्णी यांना सुचली. यावरून सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट होत असून, महापौरांनी हतबलता व्यक्त करून नाशिककरांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मंगळवारी (ता. ३) केला.

महापौर सतीश कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्रशासनातील त्रुटी मांडताना असमन्वय असल्याने शहराचा विकास खुंटल्याचा आरोप केला होता. प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त महापौरांच्या अजेंड्यावर असले, तरी विरोधी पक्षाने महापौरांनी आयते दिलेल्या संधीचे सोने करत महापौरांसह भाजपवर शाब्दिक हल्लाबोल केला.

बोरस्ते म्हणाले, की नाशिक दत्तक घेत असल्याचे आश्‍वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर नाशिककरांनी प्रथमच एकहाती सत्ता दिली. मात्र, साडेचार वर्षांत दत्तक नाशिकचा शब्द पाळला गेला नाही. अंतर्गत कुरघोडी, ठेकेदारांवर विशेष मेहेरनजर आदी कारणांमुळे नाशिकचा विकास खुंटला. सहा महिन्यांवर महापालिकेच्या निवडणुका आल्या असताना, भाजपला विकासकामांची आठवण होत आहे. साडेचार वर्षांत काहीच करता आले नाही. आता प्रशासनाला दोषी ठरवून आगपाखड केली जात आहे. भाजपने प्रशासनावर आरोप करून सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्याचे दाखवून दिले. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी साडेचार वर्षांत युती केली. आता त्याच अधिकाऱ्यांवर होणारी टीका आश्‍चर्यकारक आहे. प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्ष व नगरसेवकांची आहे. मात्र, महापौरांनी ऑनलाइन सभा घेऊन नगरसेवकांना प्रशासनाला प्रश्‍न विचारण्याची संधी दिली नाही. जादा विषयांमधील अशासकीय प्रस्ताव मंजूर करून उखळ पांढरे केले. महापौरांवर दबाव असल्याचे त्यांनी मनमोकळे सांगितले असते, तर शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिली असती. मात्र, प्रशासनाशी त्यांनी सोयीने युती केली. आता कर्जाचा डोंगर उभा करून विकासाचे उसणे अवसान आणण्याचा प्रयत्न होत आहे.

निवडणुका जवळ आल्याने भाजपला विकासकामांची आठवण झाली आहे. प्रशासनावर आरोप करून महापौरांनी सत्ताधारी पक्षाचा अंकुश नसल्याचे दाखवून दिले आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांना महासभेत बोलू दिले असते, तर प्रशासनावर अंकुश राहिला असता.

-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT