नाशिक : महापालिका निवडणुकीत (muncipal elections) महाविकास आघाडीचे (mahaviskas aghadi) संयुक्त उमेदवार उभे राहिल्यास एक गठ्ठा मतदानातून विजयाची खात्री असलेल्या इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. त्याला कारण ठाणे महापालिकेत (thane muncipal corporation) शिवसेनेने (shivsena) ‘एक ला चलो रे’ची घेतलेली भूमिका. ठाण्याचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्यानंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडी फिसकटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाविकास आघाडी फिसकटण्याची शक्यता
महापालिका निवडणुकी संदर्भात अद्याप अनिश्चितता असली तरी राजकीय पक्षाकडून निवडणुकीचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्यात १८ महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट या नागरिबहूल भागाच्या कलातून स्पष्ट होणार आहे. राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल नागरिक समाधानी आहे का, या निवडणुकीतून स्पष्ट होईल. त्यामुळे सर्वच पक्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहे. राज्यात २०१९ मध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या वेगळ्या विचाराच्या पक्षांची मिळून महाविकास आघाडीचा जन्म झाला. राज्यातील मतदारांच्या मनात महाविकास आघाडी मान्य आहे की नाही, हे महापालिका निवडणुकांच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. बहुतांश सुशिक्षित वर्ग शहरी मतदार असल्याने राजकीय पक्षांनी शहरांकडे लक्ष केंद्रित केले आहे.
भाजपला रोखण्यासाठी प्रयत्न
भाजपला रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी एकत्र येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी झाल्यास एकगठ्ठा मतदान पडून उमेदवार विजयाची अधिक शक्यता असल्याने अनेक इच्छुकांनी आघाडीसाठी पाण्यात देव बुडविले आहेत. परंतु, ठाणे शहरात महाविकास आघाडी पॅटर्नचा जन्म होण्यापूर्वीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने पॅटर्न मोडकळीस येताना दिसत आहे. मुंबई पाठोपाठ ठाण्यात शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेने ठाण्यात सर्व जागांवर उमेदवारी उभे करण्याचे सूतोवाच केल्याने नाशिकमध्येदेखील महाविकास आघाडीची शक्यता फिसकटण्याची शक्यता आहे.
एकनिष्ठांसाठी धक्का
महाविकास आघाडीसाठी नेत्यांची मानसिकता असली तरी कार्यकर्त्यांची मानसिकता मात्र स्वतंत्र लढण्याची आहे. महाविकास आघाडीचा पॅटर्न झाल्यास अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी मिळणार नसल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यातून निवडणूक पूर्व महाविकास आघाडी नकोच स्वतंत्र लढून निवडणुकीनंतर आघाडी करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडे केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.