Sanjay-Raut Google
नाशिक

विरोधकांनी तिसऱ्या लाटेची तयारी करु नये - संजय राऊत

महेंद्र महाजन

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांशी राऊत यांनी शिवसेना कार्यालयात संवाद साधला.

नाशिक : पंढरीच्या वारीसंबंधाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारकरी संप्रदायाशी चर्चा करताहेत. सामाजिक भावनेतून सरकारने आषाढी वारी बसने आणि वाखरी ते पंढरपूर पायी वारीला परवानगी हा निर्णय सरकारने मनावर धोंडा ठेऊन केला आहे. पण काही संघटना आणि विरोधक उचकवत वारकरी बांधव आणि जनतेच्या जीवाशी खेळाताहेत, असा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करायची असल्यास विरोधकांनी भडकावण्याचे काम करावे, असे आव्हान दिले. (Shivsena mp sanjay raut raut criticize opposition party nashik political news)


नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांशी राऊत यांनी शिवसेना कार्यालयात संवाद साधला. त्यानंतर हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, की कोरोनाची बंधने पाळली जातात. मात्र राजकारण थांबत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारचे काम पाहत असताना पक्षाची बांधणी करणे हे आमचे काम आहे. ग्रामीण भागात संदेश लवकर पोच नसल्याने गोंधळाची परिस्थिती राहू नये म्हणून आपला दौरा सुरु आहे. राज्याच्या सत्ताकारणात मुंबई, कोकणप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचे योगदान आहे. तीच परिस्थिती आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पुढील विधानसभा निवडणुकीत कायम राहावी यादृष्टीने संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्यात येत आहे. सत्ता असूनही प्रश्‍न आहेत. ते पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्र्यांना मी सांगणार आहे.


प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला जात आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यावर राऊत म्हणाले, की काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक सरस नेते आहेत, असे स्पष्ट केले. तसेच अनेकांना पंतप्रधान व्हावे असे वाटते. शिवाय राजकारणात आकांक्षा, स्वप्न बाळगायला हरत नाही. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सुरु आहे. त्यामुळे पटोले यांची नाराजी असावी असे वाटत नाही, असे राऊत यांनी सांगितले. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘खिशातील राजीनामे का दिले नाही,‘ या शिवसेनेच्या अनुषंगाने केलेल्या विधानाबद्दल राऊत म्हणाले, की शिवसेना स्वाभिमान असलेला पक्ष आहे. गुलामगिरीचे जीवन जगलेला नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये दुय्यम वागणूक मिळत होती. आता मुख्यमंत्रीपदी पक्षप्रमुख असल्याने स्वाभिमानी नेतृत्व अशी कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. दिल्लीत सुद्धा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे गेले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानाचे निर्णय घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते.


विरोधकांची आघाडी केल्यास बरोबरीची लढाई होईल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यातील चर्चेविषयी राऊत म्हणाले, की विरोधी पक्षांची आघाडी केल्यास बरोबरीची लढाई सत्ताधारी भाजपशी होईल. पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळमध्ये भाजपला यश मिळाले नाही. त्यामुळे २०२४ मधील निवडणुकीत काय होणार याचे आडाखे बांधावे लागतील. राजकारण चंचल आहे. इंदिरा गांधी आणि पंडीत नेहरु यांनाही राजकारणात मुठीत ठेवता आले नाही. राहूल गांधी, शिवसेनेशी सोबत प्रशांत किशोर यांची पूर्वी झाली होती. त्यामुळे पवार हे देश, राज्याची माहिती घेत असल्यास गैर काय आहे. कृषीमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नरेंद्र दराडे, सुहास कांदे, भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सुनील बागूल, वसंत गिते, विनायक पांडे आदी उपस्थित होते.

संजय राऊत म्हणालेत…

० मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाविषयीच्या तीव्र भावना पंतप्रधानांना सांगितल्या आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा सगळ्यात पहिला मोर्चा दिल्लीत काढून पंतप्रधानांना ‘एक मराठा-लाख मराठा‘ची ताकद दाखवून द्यावी.


० नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव कॅबिनेटमध्ये मंजूर करुन केंद्राला पाठवला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि दि. बा. पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. त्यांच्यासंबंधीच्या उपक्रमाबद्दल राज्य सरकारशी संवाद साधता येईल. पालकमंत्री छगन भुजबळ यांचे २५ वर्षात शिवसेनेशी संबंध राहिला नसल्याने सगळ्यांना आदर असलेल्या जेआरडी टाटा यांचे नाव पुढे करुन अनादर करण्याचे कारण नाही.


० छगन भुजबळ स्वबळावर, नाना पटोले हे स्वबळावर निवडणूक लढवायचे म्हणातेहत म्हटल्यावर नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना आपल्या बळावर लढवेल.


० राज्याचे मुख्यमंत्री अडीच वर्षानंतर बदलले जाणार नाहीत. पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असेल, असे शरद पवार यांनीही स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी तीनही पक्षाचा वाटाघाटी झालेल्या नाहीत. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम राहण्याचे कारण नाही.


० पक्षात बदल होत असतात. नाशिकमध्ये संघटनात्मक घडी बसली आहे. त्यात बदलाची गरज वाटत नाही. शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, मंत्री आपल्या भागात व्यक्तीगत काम करताहेत.


० परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविषयी आरोप करताना भान ठेवायला हवे. आम्ही अशा पद्धतीने आरोप करणाऱ्यांना उत्तर देत नाही आणि त्याकडे पाहत नाही.


वाघाच्या मिशीला हात लावण्याची लागते हिम्मत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांच्या अनुषंगाने राऊत म्हणाले, की यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणाचे संस्कार केले आहेत. शिवाय शत्रूत्व कायमस्वरुपी राहत नाही. ही चंबळच्या खोऱ्यातील डाकूंची लढाई नाही. शिवाय वाघाच्या मिशीला हात लावायला हिंमत लागते. त्याची मी वाट पाहतोय,असेही राऊत म्हणाले.
(Shivsena mp sanjay raut raut criticize opposition party nashik political news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT