Sanjay Raut In press Conference esakal
नाशिक

Shivsena Thackeray Group: ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक; 20 ऑक्टोबरला मोर्चा

मंत्र्यांच्या गाड्या अडवून नाशिक बंदचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Shivsena Thackeray Group : एमडी ड्रग्ज प्रकरणावरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, याविरोधात २० ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. १३) जाहीर केले.

ड्रग्ज माफियांवर कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल व वेळ आली तर मंत्र्यांच्या गाड्या अडवून नाशिक बंद करू, असा इशारादेखील त्यांनी दिला. नाशिककरांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. (Shivsena Thackeray group aggressive over drugs case March on 20th October nashik political)

नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निशाणा साधला. धार्मिक शहर अशी ओळख असलेले नाशिक आता गुन्हेगारांचा अड्डा बनले असून, ड्रग्ज माफिया ही नवीन ओळख निर्माण झाली आहे.

गुजरातमधून नाशिकमध्ये ड्रग्ज येत असून नाशिकचे आजी-माजी पालकमंत्री व पोलिसदेखील या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. ड्रग्जच्या माध्यमातून तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे.

त्यामुळे सरकारला जाग व नाशिक वाचवण्यासाठी २० ऑक्टोबरला आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. काही दिवसांपासून नाशिक वेगवेगळ्या अर्थाने चर्चेत आले आहे. नाशिक हे सभ्य लोकांचे शहर आहे.

सात-आठ महिन्यांपासून शहर ज्या कारणांनी गाजत आहे ते नाशिकच्या संस्कृतीला शोभणारे नाही. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांना ड्रग्जचा विळखा पडला आहे. यामुळे पालक अस्वस्थ आहे.

ड्रग्जच्या आहारी गेल्याने अनेक मुलांनी आत्महत्या केल्या. घरदार, शेती विकून तरुण ड्रग्जच्या विळख्यात सापडले. नशा व ऑनलाइन गेममुळे किती लोकांनी आत्महत्या केल्या याला जबाबदार कोण असा सवाल राऊत यांनी केला.

वर्षभरापासून नाशिक ड्रग्ज राजधानी बनले याविरोधात सर्वच नाशिककरांनी आवाज उठवण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले

यादी लवकरच जाहीर करू

गुन्हेगारी व ड्रग्ज माफियांमुळे घरे उद्ध्वस्त होत आहे. सध्याचे पालकमंत्री आणि ज्यांना पालकमंत्री व्हायचे आहे ते या नाशिकच्या अधोगतीला जबाबदार आहे.

या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची यादीदेखील आमच्याकडे असून लवकरच ती जाहीर करू, असा इशारा खासदार राऊत यांनी दिला. बरबाद होणाऱ्या तरुण पिढीला वाचविल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही.

यासाठी मोठे आंदोलन उभे करणार असून त्यासाठी आमचा इशारा मोर्चा आहे. या प्रश्नावर वेळ पडली तर आम्ही नाशिक बंद करून मंत्र्यांच्या गाड्यादेखील अडवू, असा इशारा दिला. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले तर राज्यातील गुन्हेगारी वाढते. फडणवीस यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांना पाठीशी घातले जाते, परंतु नाशिकचे नागपूर आम्ही होऊ देणार नाही असे राऊत बोलले

भुसे यांनी पाटीलला शिवसेनेत आणले

ड्रग्ज रॅकेटमध्ये प्रमुख संशयित ललित पाटील याला शिवसेनेत पालकमंत्री दादा भुसे यांनी आणले. ते शिवसेनेतून गेल्यानंतरदेखील पाटील त्यांच्यामागे गेला.

कोणाला प्रवेश द्यायचा असेल तर स्थानिक नेत्यांना विचारूनच प्रवेश दिला जातो, असे राऊत यांनी पाटील यांच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT