Shivtirth Colony Garden esakal
नाशिक

Nashik News : उद्यान मुलांना खेळण्यासाठी की मद्यपींसाठी?

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : परिसतातील शिवतीर्थ कॉलनी उद्यान लहान मुलांना खेळण्यासाठी की मद्यपी व नशा करणाऱ्यांसाठी? असा संतापजनक सवाल परिसरातील रहिवासियांमधून उपस्थित केला जात आहे. या उद्यानातील खेळणी नीटनेटकी असली, तरी उद्यानाभोवती सुरु असलेल्या इमारतीच्या बांधकामाची धूळ मोठ्या प्रमाणावर उडत असते.

त्यामुळे येथील शोभेच्या वृक्षांची सिमेंटच्या धुळीने आणि पाण्याअभावी अतिशय दुरवस्था झाल्याचे बघावयास मिळत आहे. उद्यानात गाजर गवत वाढलेले असून, कचऱ्याचेही साम्राज्य पसरलेले आहे. (shivtirth colony Park for children to play or for alcoholics bad condition Nashik News)

उद्यानात मद्यपी व इतर नशा करणाऱ्यांचा सुळसुळाट असून, हे उद्यान खरंच लहान मुलांसाठी निर्माण करण्यात आले की, या गावागुंडांच्या सोयीसाठी? असा संतापजनक प्रश्‍न स्थानिकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे या उद्यानात दिवसा व रात्रीच्या सुमारास पोलीसांनी गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

उद्यानात मोठ्या प्रमाणावर मद्याच्या रिकाम्या बाटल्या व गांजाच्या पुड्यादेखिल नेहमीच सापडत असतात. त्यावरूनही येथील परिस्थितीची कल्पना येऊ शकते. परंतु, प्रत्यक्षात याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

* उद्यानात गाजर गवत वाढलेले आहे
* शोभेच्या वृक्षांनीही मान टाकल्या
* उद्यानात रोज पाणी मारण्याची गरज
* गावागुंडांचा वावर
* पोलीस गस्त सकाळ संध्याकाळ करण्याची मागणी
* उद्यानातील वृक्षांच्या संवरक्षण जाळी तुटलेल्या अवस्थेत
* उद्यानात मद्याच्या रिकाम्या बटल्यांचा खच

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

"उद्यानात गावगुंडांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून, येथे स्थानिक पोलिसांनी दिवसा व रात्रीच्या वेळेस गस्त घालणे गरजेचे आहे. या गावगुंडांमुळे महिला रात्रीच्या वेळेस घरातून बाहेर पडण्यासाठी प्रचंड घाबरत असतात." सुमन अहिरे (गृहिणी)

"उद्यानाच्या परिसरातील शोभेच्या वृक्षांनी अक्षरश: मान टाकलेली असून, या वृक्षांवर मोठ्या प्रमाणावर सिमेंटची धूळ बसलेली आहे. या व्यतिरिक्त या वृक्षांना रोज पाणी टाकणे गरजेचे आहे." संजीवनी देसले (गृहिणी)

"उद्यानामधील ग्राउंडवर रोजच्या रोज पाणी मारणे गरजेचे आहे. उद्यानातील साफसफाई झाल्यानंतर अनेकदा कचरा उद्यानात जाळला जाण्याचे प्रकार घडत असतात. उद्यानात कचरा जाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिकेने कठोर कारवाई केली पाहिजे." सोनल कुलकर्णी (गृहिणी)

"उद्यान हे लहान मुलांच्या खेळण्यासाठी की गावगुंडांसाठी? असा प्रश्‍न उपस्थित होत असून, दिवसा व रात्रीच्या सुमारास येथे गावगुंडांसह प्रेम युगुलही येऊन बसलेले असतात. यांना हटकण्यासाठी गेल्यास शिवीगाळ करणे, अंगावर धावून येणे असे प्रकार घडत असतात."

सावित्री जाधव (गृहिणी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

IND vs AUS: रोहित, शुभमनची पर्थ कसोटीतून माघार; जसप्रीत बुमराह कर्णधार! जाणून घ्या Playing XI कशी असणार

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

SCROLL FOR NEXT