A primary health center found at the heart of the problem in the Dang border area. esakal
नाशिक

Nashik News: धक्कादायक! बॅटरीच्या उजेडात महिलेची प्रसूती; पांगारणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

तालुक्याच्या सीमावर्ती भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये अनेक पदे रिक्त असून, त्याचा फटका गोरगरीब आदिवासी रुग्णांना बसत आहे

सकाळ वृत्तसेवा

पळसन : गारणे प्राथमिक आरोग्य केंद्रात बॅटरीच्या उजेडात महिलेची प्रसूती करण्यात आली. तालुक्याच्या सीमावर्ती भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये अनेक पदे रिक्त असून, त्याचा फटका गोरगरीब आदिवासी रुग्णांना बसत आहे. (Shocking Woman giving birth in battery light incident in pangarane Primary Health Centre Nashik News)

पांगारणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी (ता. ८) सायंकाळी सहाच्या सुमारास मांधा (गुही) येथील नेहा सचिन महाले यांना तिचे सासरे मनोहर महाले यांनी प्रसूतीसाठी दाखल केले असता, तेथे अंधाराचे साम्राज्य होते.

प्रसूती कक्षात बल्ब नव्हता. बन्सीराम राऊत (रा. चिंचमाळ) यांनी बल्ब विकत आणून लावला. वीस रुपयांची चायना बॅटरी आणून बॅटरीच्या उजेडात वैद्यकीय अधिकारी डॉ. उशीरे व परिचारिकेने प्रसूती यशस्वी केली. या धक्कादायक प्रकारामुळे प्रशासनाविरुद्ध आदिवासी जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

पांगारणे प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या गर्तेत आहे. आरोग्य केंद्रात परिचर नसल्याने साफसफाई करायची कोणी, असा सवाल उपस्थित होत आहे. आरोग्य केंद्र नसून, नुसते पत्र्याचे शेड आहे.

पावसाळ्यात ते गळते. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. ‘आरोग्य केंद्रापेक्षा आमची कौलारू छप्पराची घरे बरी’, अशी म्हणण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही.

स्वच्छतेचा अभाव आहे. शेडची उंची कमी असून, पत्र्यामुळे उन्हाळ्यात उन्हाचे चटके सहन करावे लागतात. शेडचे चौरस बांधकाम असल्याने कोंदट वातावरण होते. पुरेशी हवा खेळती राहत नाही.

दिवसा अंधार कोठडी तयार होते. खिडक्या गंजल्या असून, खिडक्यांना जाळ्या नाहीत. परिसरात जुगार मटक्याच्या चिठ्या निदर्शनास येतात. लगतच्या सभामंडपात पत्यांचा डाव रंगत असल्याने त्या टवाळांचा कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.

नेहमीच औषधांचा तुटवडा, विजेची समस्या, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोना काळात जनतेने लोकवर्गणीतून जनरेटर दिले आहे. त्याचा वापर वीजपुरवठा नसेल, त्यावेळी करणे जरूरी आहे.

आवारात सोलर सिस्टीम बसविली आहे. त्याचा उपयोग उजेडसाठी का केला जात नाही, असे प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केले आहेत. आरोग्य केंद्रात काही महिन्यांपूर्वी चांगली सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकारी बैरागी यांना एका मद्यपीने मारहाण केली होती.

त्यामुळे त्या अधिकाऱ्याने इतरत्र बदली करून घेणे पसंत केले. पांगारणे प्राथमिक आरोग्य केंद्र बारागाव डांग सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे.

अपघात, सर्पदंश, श्वानदंश, श्वापदे, वन्यजीवांचा हल्ल्यावेळी या आरोग्य केंद्राचा आधार नागरिकांना मिळतो. त्यामुळे रिक्त पदे भरून अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

"सोमवारी (ता. ८) मांधा येथील महिलेला प्रसूतीसाठी रात्री साडेअकराला कक्षात घेतले. रात्री सव्वा बाराला अचानक वीज गेली. त्यावेळी आमच्याकडे एक टार्च व मोबाईलची लाईट होती. प्रसूतीवेळी रुग्णांच्या नातेवाइकांकडे असलेल्या बॅटरीचा उपयोग केला. चांगल्या उजेडात प्रसूती सुखरूप झाली. स्त्री कक्षातील बल्ब उडाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी आरोग्य कर्मचारी व परिचारिकेला न सांगताच एक बल्ब विकत आणून बसविला. आरोग्य केंद्रात दोन वर्षांपासून एकही शिपाई व कर्मचारी नाहीत. त्यामुळे रुग्णसेवा देण्यात अडचणी येत आहेत. इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने अनेक पदे रिक्त आहेत."- डॉ. जयेंद्र थविल, वैद्यकीय अधिकारी

पांगारणे प्राथमिक आरोग्य केंद्र, व केंद्रांतंर्गत (रघतविहीर, कुकुडणे, करंजूल, गोंदुणे, हडकाईचोंड) रिक्त पदे अशी

-आरोग्य सहाय्यक- १

-परिचारिका-५

-परिचर-५

-औषध निर्माता-१

-वैद्यकीय अधिकारी-१

-आरोग्यसेवक- ४

-कनिष्ठ लिपिक- १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT