नाशिक : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लॉकडाउनचे निर्बंध प्रशासनाने शिथिल केले असून, चित्रीकरणालाही परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी देत असताना, वेळेचे निर्बंध घातल्याने चित्रीकरणासाठी निर्मात्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये चित्रीकरण सुरू नसून चार ते पाच दिवसांत बायो-बबलचे नियम पाळून मालिकांच्या चित्रीकरणाला प्रारंभ होणार आहे. (shooting of the serials will start in Nashik following the rules of bio-bubble)
गेल्या आठवड्यात प्रशासनाने चित्रीकरणाला परवानगी दिली. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाउनमध्ये अनेक कलाकारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. चित्रीकरणाला परवानगी दिल्याने कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. पहिल्या लाटेनंतर अनलॉक प्रक्रियेत चित्रीकरणाला परवानगी दिल्यानंतर वेळेचे कुठलेही बंधन नव्हते. त्यामुळे अनेक प्रोजेक्ट्सचे चित्रीकरण नाशिकमध्ये सुरू होते. आता परवानगी मिळाली, तरी चित्रीकरणाशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना बायो- बबल वातावरणातच राहणे बंधनकारक आहे. चित्रीकरणासाठी सायंकाळी पाचपर्यंत असणाऱ्या वेळेच्या निर्बंधामुळे नाशिकमध्ये होऊ घातलेले काही प्रोजेक्ट्स आणखी काही कालावधींसाठी रखडण्याची शक्यता आहे. जूनअखेर आणखी निर्बंध शिथिल होतील, अशी आशा कलाकार, निर्मात्यांना आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर नाशिकमध्ये सुरू असलेल्या मालिकांचे चित्रीकरण परराज्यात हलविले होते.
चित्रीकरणाला सायंकाळी पाचपर्यंत परवानगी असून, बायो-बबलचे नियम आहेत. साधारण सायंकाळी सातपर्यंत परवानगी मिळायला हवी. आताचे निर्बंध अडचणीचे असून, चित्रीकरणासाठी निर्बंध आणखी शिथिल होण्याची वाट पाहत आहोत.
-अमित कुलकर्णी, एकदंत फिल्म
प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर अजूनही नाशिकमध्ये चित्रीकरण सुरू झाले नसून चार ते पाच दिवसांत मालिकांचे चित्रीकरण सुरू होईल. मालिकांच्या चित्रीकरणाला वेळ लागतो. वेळेचे निर्बंध असल्यामुळे बायो-बबलचे नियम पाळून चित्रीकरण करण्यात येईल.
-प्रणव प्रभाकर, अभिनेता
(shooting of the serials will start in Nashik following the rules of bio-bubble)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.