shop burglary looting food worth 1 lakh nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime : दुकान फोडून पावणेदोन लाखाचे खाद्यपदार्थ लंपास

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : खाद्यपदार्थाचे दुकान फोडून पावणेदोन लाखाचे खाद्यपदार्थांवर डल्ला मारण्यात आला.

टेकचंद मगरमलानी यांची टाकळी रोड येथील काठे मळा अनमोल फूड्स दुकान आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता, कुलूप तुटलेले आढळले. (shop burglary looting food worth 1 lakh nashik crime news)

दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. सर्व सामानाची पाहणी केली असता ३१ किलो बटर आणि २४ किलो चीजचे सुमारे १ लाख ४५ हजार ४४० रुपयाचे खाद्यपदार्थ अज्ञात संशयितांनी चोरून नेल्याची खात्री झाली. श्री. मगरमलानी यांनी भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली.

त्यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या तीन दिवसातील घरफोडीची तिसरी घटना आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गुरुवारी (ता.३) काठे गल्ली येथील घरात सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे साडेआठ लाखांचा ऐवज चोरी गेला होता.

ट्रॅक्टर हाऊस परिसरात बंद घराचे कुलूप तोडून घरातून सुमारे ५० हजाराचा ऐवज लंपास करण्याची घटना ताजी असतानाच शनिवारी काठे मळा येथील दुकान फोडून खाद्यपदार्थ चोरी झाल्याची घटना घडली. तीन दिवसात तीन घरफोडी करून संशयितांनी जणू पोलिसांना आव्हान दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parivartan Mahashakti : तिसऱ्या आघाडीचे १५० जागांवर एकमत; पुण्यातील ‘परिवर्तन महाशक्ती’च्या बैठकीमध्ये निर्णय

Nashik Shootout Case : दीपक बडगुजरची पोलिसांसमोर गैरहजेरी; पोलिस न्यायालयात जाण्याची शक्यता

Sakal Podcast: रेल्वेसाठी आता फक्त दोन महिने आधी तिकीट बुक होणार ते विप्रोनं सलग चौदाव्या वेळी दिला बोनस शेअर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 ऑक्टोबर 2024

Panchang 18 October: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा

SCROLL FOR NEXT