Nashik News : विविध प्रकारच्या शालेय साहित्य खरेदीला दुकानांमध्ये गर्दी होत आहे, त्यातच थ्रीडी कार्टूनचे चित्र असलेली स्कूल बॅग, छोटा भीम, डोरेमॉन यांच्यासोबतच सेलीब्रेटींचे चित्र असलेले नोटबुक, पेन्सिलसोबतच जम्बो खोडरबर, शार्पनर अशा विविध साहित्यांनी भरलेली कंपासपेटी, वेगवेगळ्या शाळांचे गणवेश, नवीन बूट, टाय असे नवनवीन शालेय साहित्य खरेदीसाठी बच्चे कंपनीला सोबत घेऊन पालकांची लगबग सुरू असल्याचे चित्र सिन्नर शहरात दिसत आहे.
राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठा शालेय साहित्यांनी गजबजून गेल्या आहेत. (shopping for school supplies Increase in price of school supplies Toddlers students parents rush to shop Nashik News)
शाळेचा पहिला दिवस जवळ आल्यामुळे ऐनवेळेस घाई नको, म्हणून पालक आतापासूनच पाल्यांसाठी वह्या, पुस्तके, दप्तर, कंपास, बूट, रेनकोट, छत्री, बॅग, कंपास घेण्यासाठी दुकानांमध्ये शालेय साहित्य घेण्यासाठी जात आहे.
विद्यार्थी नोटबुक खरेदी करताना क्रिकेटपटू, चित्रपट कलाकार यांचे चित्र असलेल्या नोटबुकपेक्षा निसर्गचित्र असलेल्या नोटबुकला पसंती देत आहे, बच्चे कंपनीचा ओढा मात्र कार्टून चित्र यांच्याकडे आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध रंगांच्या, आकाराच्या बॅग्ज बाजारात आल्या आहेत. स्कूल बॅगप्रमाणेच यंदा कार्टूनचे चित्र असणारे प्लॅस्टिक कंपास बॉक्स बाजारात उपलब्ध असून त्याची किंमत ३० ते ३५० रुपयांपर्यंत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
स्कूल बॅगचे आकर्षण...
मोटू-पतलू, छोटा भीम, स्पायडर मॅन, बॅनटॅन, पॉकिमन, बार्बी, डोरेमॉन, अँग्री बर्डस् अशी विविध चित्रे असलेल्या स्कूल बॅगला बच्चे कंपनीची सर्वात जास्त पसंती असून या स्कूल बॅगच्या किमती १५० ते ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत.
साहित्याच्या किमतीत ४० टक्के वाढ
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शालेय साहित्यांच्या किमतीमध्ये ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एका वहीमागे ७, १०, १५, २० असा फरक पडला आहे. गेल्यावर्षी शंभर पानी वही १५० रुपये डझन होती.
ती सध्या २७० ते २८० रुपये डझन, दोनशे पानी वही ३०० रुपये डझनची आता ४२० रुपये डझन, फुलस्केप पानी वही ४०० रुपये डझन होती ती ५४० रुपये, अशा दराने उपलब्ध आहेत.
"केजीच्या वर्गापासून तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य खरेदीला गत आठवड्यापासून सुरवात झालेली असून विद्यार्थ्यांच्या साहित्यांची आवडी निवडी या वेगवेगळ्या प्रकारच्या असल्याने अनेक प्रकारचे साहित्य दुकानात विक्रीस आणले आहे."
रोहित भगत, फ्रेंड्स बुक स्टॉल विक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.