Unused slag in Panchavati municipal complex. esakal
नाशिक

Nashik News : पंचवटीतील NMC संकुलातील गाळे वापराविना धूळखात पडून

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : व्यावसायिळे संकुल उभारण्याचे काम महापालिकेकडून करण्यात आले. मात्र, पंचवटीतील अशा गाळे संकुलाला प्रतिसाद मिळत नसल्याचे अनेक गाळे संकुल वापराविना पडून असल्याने दिसत आहे. त्यामुळे उभारण्यात आलेल्या या गाळे संकुलात मोजकेच गाळे वापरात असून बाकीचे धुळखात पडून असल्याचे चित्र दिसत आहे. ज्यासाठी या गाळे संकुलाची उभारणी करण्यात आली. त्याऐवजी अडगळीच्या वस्तू फेकण्यासाठीच गाळ्यांचा उपयोग होत असल्याचे दिसते.

पंचवटीसारख्या धार्मिक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी नारोशंकर मंदिराच्या समोरच्या बाजूला सुमारे वीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले गाळे संकुलात टपाल कार्यालय वगळता इतर सर्व गाळे पडून आहेत. या संकुलाचा तळमजला हा खास पार्किंगसाठी सोडण्यात आलेला आहे, पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर गाळे काढण्यात आलेले आहेत. यातील काही गाळ्यांचे शटर अर्धवट उघडे आहेत.

काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. येथील टपाल कार्यालयात येणाऱ्यांची वाहने पार्किंगच्या जागेत पार्क करणे अवघड होते. याच पार्किंगच्या जागेत इतर वाहने पार्क केली जातात. तसेच, कपड्यांचे गाठोड्यांचा ढिगारा येथे पडलेला असतो. येथे खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांचा त्याचा अडथळा पार करून जावे लागते. गंगाघाटाच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या या गाळे संकुलाच्या बाजूला म्हसोबा पटांगण असल्याने या भागात नाशिकच्या धार्मिक तीर्थस्नानावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांची वाहने थांबतात.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

त्यामुळे येथे अनेक व्यवसाय होऊ शकतील, अशा उद्देशाने या गाळे संकुल उभारण्यात आले असले तरी व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ते गाळे पडून आहेत.

भाडे परवडत नसल्याचे कारण

पेठ रोडला महापालिका बाजारही असाच रस्त्यालगतच्या भागात असूनही तेथील व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार या झोपडपट्टीच्या परिसरात राहणारा वर्ग त्याच्याकडून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तू यांना मर्यादा असल्यामुळे कमी दराचे भाडे असलेले गाळे मिळत नाहीत. गाळ्यांचे भाड्याचे दर परवडत नसल्यामुळे येथील व्यावसायिकांनी गाळे सोडून दिल्यामुळे हा महापालिका बाजारही वापराविना पडून असल्याने तेथे अडगळीचे साहित्य टाकण्यात येत असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT