shraddha kurhade esakal
नाशिक

Success Story : जिद्दी तरुणीची पोलिस पदाला गवसणी! श्रद्धा कुऱ्हाडे बनली पहिली महिला पोलिस

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पोलिस भरतीसाठी प्रचंड मेहनत घेऊन यशस्वी झालेली पहिली महिला पोलिस ठरली आहे, कोकणगावची श्रद्धा कुऱ्हाडे.

शिवणकामात आईला मदत करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणाऱ्या जिद्दी तरुणीला यश प्राप्त झाल्याने आईसह वडिलांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. (Shraddha Kurhade became first woman police officer kokangaon nashik news)

श्रद्धा कुऱ्हाडे ही निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील तरुणी. आई शिवणकाम करते, तर वडिलांचे छोटेसे गॅरेज. जिद्दीवर विश्वास ठेवणारी आणि बालपणापासून मेहनत करणारी. गावात येणाऱ्या पोलिसांची छाप बालमनावर पडली आणि तेच स्वप्न झालं.

आई सोबत शिवणकाम करताना पोलिस होण्याच्या स्वप्नाचं देखील विणकाम या तरुणीने साकारलं आहे. गरिबीतून वर आलेल्या श्रद्धाची मुंबई पोलिस दलात निवड झाल्यामुळे कुऱ्हाडे कुटुंबावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वडील चंद्रकांत कुऱ्हाडे यांचे पत्नी अनिता, मुलगा अनिकेत आणि मुलगी श्रद्धा असे चौकोनी कुटुंब. शेती नसल्यामुळे ते वाहन दुरुस्तीची कामे करतात. तर घरखर्चास मदत व्हावी म्हणून आई शिवणकाम करते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बालपणातच श्रद्धाच्या मनावर पोलिसांची छाप पडली. पोलिसांच्या वर्दीचे स्वप्न ती बघू लागली. त्यासाठी काय प्रक्रिया असते, याची बालपणीच माहिती घेऊ लागली. तिने फक्त स्वप्न न बघता ते पूर्ण करण्यासाठी रोडमॅपही आखला. वर्दीच्या स्वप्नांना मेहनतीची जोड दिली. ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण झाले.

त्यानंतर ओझर येथील महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले. या काळात तीन वर्षे मेहनत घेऊन एनसीसीचे शिक्षणही पूर्ण केले. न थकता वर्षभरात मैदानी सरावात सातत्य ठेवले. मैदानी कसरत करावी, महाविद्यालयात जावे आणि सायंकाळी पुन्हा कसरत करावी, असा तिचा दिनक्रम होता. वेळ मिळाला, की आईस शिवणकामात ती मदत करत असे.

भरतीतील बारकावे समजून घेण्यासाठी तिने नाशिकमधील नामांकित प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. एक वर्ष सर्व केल्यानंतर मुंबई पोलिसांसाठी मैदानी चाचणी आणि परीक्षा दिली. त्यात ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.

प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण मेहनत घेतल्यास यश मिळते, असे तिने ‘सकाळ’ला सांगितले. श्रद्धाच्या यशाचे तालुकभरात कौतुक होत आहे. तिचा कोकणगाव ग्रामस्थांतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT