Flower Seller esakal
नाशिक

Shravan Maas 2023: श्रावणामुळे फुलांचे दर गगनाला! मागणीत वाढ झाल्याने दरांत तेजी

सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Shravan Maas 2023 : श्रावण महिन्याला मंगळवार (ता. १८) पासून सुरवात झाली. त्यामुळे शिवालयांसह सर्वच मंदिरातील भाविकांच्या गर्दीतही मोठी वाढ झाली आहे. सहाजिकच भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेलाच्या पानांसह सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे.

यंदा पाऊस व अन्य कारणाने फुलांच्या आवकेत घट झाल्याने झेंडू, गुलाब, शेवंतीसह सर्वच प्रकारच्या फुलांचे दर आज गगनाला भिडल्याचे बाजारात दिसून आले. (Shravan Maas 2023 Flower prices increased to Shravan Prices rise due to increase in demand nashik)

श्रावण महिना म्हटले की हिंदू धर्मीयांचे जप-तप, व्रत वैकल्ये सुरू होतात. त्यामुळे शिवालयांसह सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळते. सहाजिकच या काळात फुलांच्या मागणीत मोठी वाढ होते.

परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने एरवी अडीचशे तीनशे रूपयांत मिळणाऱ्या पिवळ्या झेंडूच्या क्रेटसाठी चक्क पाचशे ते सहाशे रुपये मोजावे लागत होते, तर लाल झेंडूही चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत जाऊन पोचला होता.

याशिवाय मोठी मागणी असलेली व्हाइट शेवंती शंभर रुपये किलो, तर लाल शेवंती एकशे ऐंशी रुपये किलोपर्यंत उपलब्ध होती. एरवी दहा रूपयांत मिळणारा दहा फुलांचा गुलाबाचा छोटा गुच्छ तीस रुपयांपर्यंत पोचला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बेलाच्या पानांच्या भावातही वाढ

भगवान शिवशंभूंना बेलाच्या पानांची आवड असल्याने शिवभक्तांकडून बेलाची पाने अर्पण केली जातात. ही पाने त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, पेठ, हरसूल, वणी, दिंडोरी आदी भागातून आदिवासी शहरात विक्रीसाठी हे विक्रेते सोमवारपासूनच मोठ्या संख्येने शहराच्या विविध भागांसह गंगाघाटावर दाखल झाले आहेत.

पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने आज फूलबाजारात बेलाच्या पानांचा वाटा पन्नास रुपयांपर्यंत जाऊन पोचला होता. दुपारनंतर यात थोडी घट झाली.

अडीच हजार रुपयांचा हार

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी दोन दिवसांपूर्वी राज्याचे अर्धेअधिक मंत्रिमंडळ नाशिकमध्ये होते. सहाजिकच या काळात तयार हारांचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने फूलबाजारात आधीच तेजी होती.

त्यातच मंगळवारपासून श्रावण सुरू झाल्याने छोट्या हारासाठी पन्नास रुपये, तर मोठ्या हारासाठी दोनशे रुपये मोजावे लागत होते. याशिवाय बाजारात चक्क अडीच हजार रुपयांच्या हाराची मागणी नोंदविण्यात आल्याचे ओमसाई फ्लॉवर्सचे प्रफुल्ल माळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

Imtiaz Jaleel : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतांच्या फुटीचा जलील यांना फटका

Devendra Fadnavis : फडणवीस यांचा विजयी ‘षटकार’

SCROLL FOR NEXT