Shrikant Bhartiya lunch stirs excitement in Nashik politics news  
नाशिक

Shrikant Bhartiya: श्रीकांत भारतीय यांच्या स्नेहभोजनाने नाशिकच्या राजकारणात खळबळ

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: देशातील पाच विधानसभा निवडणुकांचा निकाल येण्याच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमदार श्रीकांत भारतीय यांनी माजी नगरसेवक ॲड. शिवाजी सहाणे यांच्या निवासस्थानी भेट घेत स्नेहभोजन केल्याने नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचा दावा केला जात आहे.

सहाणे यांच्या भेटीने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हादरा बसलाच, त्याशिवाय शिवसेनेच्या शिंदे गटासाठीदेखील हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षासाठी हा देखील मोठा धक्का मानला जात आहे. (Shrikant Bhartiya lunch stirs excitement in Nashik politics news)

लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्यातरी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्याने निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार श्रीकांत भारतीय यांनी नाशिक दौऱ्यावर येत ॲड. सहाणे यांच्या घरी भेट देत त्यांच्या सोबत स्नेहभोजन घेतल्याने नाशिक जिल्ह्यातील राजकारणात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

ॲड. सहाणे यांनी या आधी दोन वेळा विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून दोनदा निवडणूक लढविली. पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे भुजबळ समर्थक जयंत जाधव यांच्या समवेत लढत झाली. या वेळी तांत्रिक त्रुटीच्या कारणास्तव प्रशासनाने जयंत जाधव यांना विजयी घोषित केले होते. त्या निकालाला सहाणे यांनी उच्च न्यायालयात आव्हानही दिले. २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात सहाणे यांनी आव्हान दिले.

मात्र हा निकाल येईपर्यंत विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्याने तो खटला रद्दबातल ठरला. त्यानंतरच्या निवडणुकीत साने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात विधान परिषदेची निवडणूक लढवली. यात दराडे यांचा विजय झाला. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राजकीय आखाडे बांधले जात आहेत. त्यात आमदार भारतीय यांनी ॲड. सहाणे यांची भेट घेतल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजपमध्ये नाराजी

आमदार भारतीय यांनी सहाणे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यामुळे नाशिक शहराच्या राजकारणात खळबळ उडाली असली तरी भारतीय जनता पक्षमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये देखील संशय निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिकमध्ये असतानादेखील हा प्रकार घडल्याने यामागे मोठे राजकारण असल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT