Camels transported from Nashik to Srimad Rajchandra Mission Jivamaitridham Veterinary Care Center in Dharampur (Gujarat) esakal
नाशिक

Nashik News: नाशिकच्या उंटासाठी संजीवनी ठरले गुजरातचे श्रीमद् राजचंद्र मैत्रीधाम!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : धरमपूर येथील प्राणीसेवा उपक्रम म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमद् राजचंद्र मिशन जीवमैत्रीधामच्या स्वयंसेवकांनी नाशिकमध्ये १६९ उंटांची सुटका करीत पुनर्वसन केले. या उंटाची अवैध वाहतूक होत असल्याची तक्रार होती.

त्यावरुन संस्थेने राज्यपाल रमेश बैस यांच्या सूचनेनुसार स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने संस्थेने उंटाच निर्जलीकरण, उपासमार आणि वैद्यकीय मदतीतून संगोपन चालविले आहे.

श्रीमद् राजचंद्र जीवमैत्रीधामच्या पथकाच्या मदतीने उंटाची अखेरपर्यंत संगोपन, उपचार आणि काळजी प्रदान करण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी, पशुवैद्यकीय अधिकारी गिरीश पाटील यांच्या देखरेखीखाली नाशिकमधून सुखरूपपणे या उंटाचे धरमपूर येथे स्थलांतर झाले.

बहुतेक उंट आजारी, काहीचे खूर खराब झाल्याने उभे राहू शकत नसल्यामुळे आणि बचावानंतर प्रसूत झालेल्या ३ दिवसांच्या बछड्यांमुळे, स्वयंसेवकांनी त्या उंटांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला.

गुजरातमधील धरमपूर येथील श्रीमद् राजचंद्र जीवमैत्रीधामच्या पशू रुग्णालय आणि निवारागृहात, जिथे २० पशुवैद्य आणि तज्ज्ञांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती सुधारत आहे.

इतर राज्यांच्या हवामान उंटासाठी अयोग्य आहे. त्यामुळे, विश्रांती घेतल्यानंतर, त्यांचे राजस्थानमधील सिरोही येथील महावीर उंट अभयारण्यात त्यांचे सुरक्षित पुनर्वसन केले जाईल. असे संस्थेचे विश्वस्त रतन लुणावत यांनी सांगितले.

संस्थेचे संस्थापक गुरुदेव श्री राकेशजी यांच्या प्रेरणेतून माणसांप्रमाणेच पशू आणि प्राण्यांच्या संगोपन उपचार देण्याच्या भावनेतून श्रीमद् राजचंद्र जीवमैत्रीधाम गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहे. तज्ज्ञ पशुवैद्यक आणि निःस्वार्थी स्वयंसेवकांच्या मदतीने हा उपक्रम चालतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात, पशुप्रती कृतज्ञ भावनेतून पशूंची दीर्घकाल, शाश्वत काळजी घेतली जाते. नवीन १५० बेडच्या श्रीमद् राजचंद्र मल्टिस्पेशालिटी ऍनिमल हॉस्पिटलचे बांधकाम सुरु असून लहान प्राण्यांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसह प्राणी आरोग्य सेवेसाठी संस्था कार्यरत आहे.

पशू रूग्णालयात विदेशी, जंगली आणि शेतातील प्राण्यांसाठी चोवीसतास ओ. पी. डी. आणि आय. पी. डी., प्राण्यांसाठी डायलिसिस, रक्तपेढी, लेझर थेरपी उपचार, प्राण्यांचे कृत्रिम अवयव, कर्करोग उपचार, लॅपरोस्कोपी आणि एंडोस्कोपी या सर्व सेवा एकाच छताखाली देऊ करणाऱ्या भारतातील काही रुग्णालयांपैकी हे एक असेल.

पंतप्रधानाच्या हस्ते उद्घघाटन झालेल्या प्रकल्पात २ हजार प्राण्यांच्या क्षमतेचे निवारागृह, प्राण्यांबद्दल प्रेम वाढविण्यासाठी आणि प्राण्यांच्या क्रूरतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एक अनुभव केंद्र आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. असेही संस्थेच्या सूत्रांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT