shubhangi patil on being not reachable nashik graduate constituency election political news  Sakal
नाशिक

Nashik Graduate Constituency : काही कारण असल्याशिवाय व्यक्ती नॉट रिचेबल नसतो, शुभांगी पाटील स्पष्टच बोलल्या

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : मागील काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच काँग्रेसकडून सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला.यानंतर आता ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांना पाठींबा जाहीर केला.

यानंतर शुभांगी पाटील या सकाळपासून नॉट रिचेबल होत्या. मात्र काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमासमोर येत कोणाचा पाठींबा आणि कोणचा विरोध यावर प्रतिक्रीया दिली.

नाशिक पदवीधर उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून अचानक नॉट रिचेबल झाल्याने या निवडणूकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला होता.सोमवारी (ता. १६) दुपारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ संपल्यानंतर मात्र शुभांगी पाटील माध्यमांसमोर आल्या. यावेळी आपल्याला नॉट रिचेबल का व्हावे लागले याबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

नॉट रिचेबल होण्याचं कारण योग्य वेळेवर सांगेन, काहीतरी कारण असल्याशिवाय व्यक्ती नॉटरिचेबल होत नाही असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

शुभांगी पाटील म्हणाल्या, हे राजकारण आहे त्यामुळे ते कसं वळण घेईल याची शाश्वती देता येत नाही. उद्धव ठाकरे मला पाठिंबा देतील असा मला पुर्ण विश्वास आहे. यासह नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षश्रेष्ठींवर मला विश्वास आहे, असेही शुभांगी पाटील म्हणाल्या आहेत. मविआच्या सर्व नेत्यांशी संपर्क केला असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले.

भाजपने का उमेदवारी दिली नाही?

तुम्ही पक्षात या तुमचा विचार करू असा विश्वास मला भाजपकडून देण्यात आला होता, म्हणून मी तीन महिन्यापूर्वीच भाजप पक्षात गेले होते. काहीतरी शब्द दिला असेल म्हणूनच मी तीन महिन्यांसाठी पक्षात गेले. मात्र भाजपने आता वेगळा विचार केला असेल त्यामुळे त्यांनी मला उमेदवारी दिली नसेल असे त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. तसेच अनेक शिक्षक संस्थाशी चर्चा केली आहे आणि पाठिंबा मागितला आहे असेही शुभांगी पाटील म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT