inquiry report file Photo esakal
नाशिक

Nashik News: श्याम गोसावींचा चौकशी अहवाल 2 दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेचे सहआयुक्त श्याम गोसावी यांच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांच्याकडे शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.

पुढील दोन दिवसांत चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. (Shyam Gosavi inquiry report to Collector in 2 days Nashik News)

पाच सदस्यीय चौकशी समितीकडून नगरपालिका शाखेच्या दफ्तराची गेल्या सप्ताहापासून तपासणी केली जात आहे.

नगरपालिका शाखेत जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत प्राप्त झालेल्या टपालापैकी तब्बल ६५६ कार्य विवरणपत्रे नोंदविली नसल्याचे उघड झाले आहे, तसेच ११ न्यायालयीन संदर्भ प्रलंबित आहेत.

त्यामुळे कामकाजात अनियमितता झाली असल्याचे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या चौकशीत प्रथमदर्शनी उघड झाले आहे.

चौकशी पूर्ण झाल्यानंतरचा हा अहवाल आता संयुक्तरीत्या तयार करून तो निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ हे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना सादर करतील.

तपासणीवेळी ई-टपाल, वेतन व संवर्ग समावेशन, रजा, विभागीय चौकशा व न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्याचे उजेडात आले. त्यानंतर पथकाकडून नगरपालिका शाखेकडील आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू करण्यात आली.

त्यात नगरपालिकांकडून आलेले कामांचे आर्थिक प्रस्ताव, बिले, निधी वितरणासह नगरपालिकांना मागणीनुसार निधी मिळाला का याची खातरजमा केली जाते आहे. अहवालानंतर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT