Saptashrungi Devi Gad : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या वणी येथील श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवीच्या मंदिरासाठी चांदीचा नवीन नक्षीदार गाभारा पु. ना. गाडगीळ आणि सन्स (पीएनजी सन्स)ने केला आहे. नवरात्रापासून नव्या स्वरूपात भाविकांना मंदिरातील गाभाऱ्यात चांदीतील केलेल्या सुबक कामाचा साज अनुभवता येणार आहे.
मंदिरातील गाभाऱ्यास चांदीने सुशोभित करण्याचा निर्णय सप्तशृंगी मंदिर समितीने घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील आघाडीच्या ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी सन्सची निवड केली. या संदर्भात मंदिर समितीचे भूषणराज तळेकर म्हणाले, पीएनजी सन्सने यापूर्वी देवीसाठी सोन्याचे अलंकार घडविले होते. (Silver carving in core of Saptashrungi Devi temple nashik news)
त्यांचा अनुभव, गुणवत्ता व सर्वोत्तम कारागिरीमुळे समितीने पीएनजी सन्सला गाभाऱ्याचे काम देण्याचा निर्णय घेतला. चांदीमध्ये अत्यंत सुबक नक्षीकाम झाले असून, नियोजित वेळेत ते पूर्ण झाल्याचे समाधान आहे.
पीएनजी सन्सचे अध्यक्ष व संचालक अजित गाडगीळ म्हणाले, गाभाऱ्यातील नक्षीकाम करण्यापूर्वी आम्ही त्यावर अभ्यास केला. नक्षीकामात परंपरेला अनुसरून हत्ती, विविध पक्षी, पाने, फुले, वेली, घंटा, कीर्तिमुख, नवग्रह, मोर, शंख, कमळ आदी शुभ प्रतीकांचा वापर नक्षी म्हणून केला आहे. मंदिर समितीने देवीची सेवा पुन्हा करण्याची संधी आम्हाला दिली हा आमचा सन्मान आहे.
पीएनजी सन्सतर्फे नाशिक झोनचे सेल्सप्रमुख राहुल शेवकरी व श्रीकांत कुबेर यांनी काम पाहिले. कामाच्या तपशिलाबाबत शेवकरी म्हणाले, देवस्थानाला आम्ही सुचविलेली चांदीतील नक्षीकामाच्या रचना आवडल्या.
त्यानुसार सव्वा वर्षापूर्वी प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. संपूर्ण रचना ही आमच्या कुशल रचनाकारांनी केली असून, ७० कारागिरांनी चांदीवर प्रत्यक्ष नक्षीकाम केले. सुमारे ४६५ किलो चांदी मंदिर समितीने आम्हाला उपलब्ध करून दिली. सागवानी लाकडावर चांदीचे नक्षीकाम बसविले आहे.
‘यापूर्वी देवीचे नवे अलंकार आम्ही नवरात्रापूर्वीच पूर्ण केले होते. मंदिर समितीने या वर्षी नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. वेळेत काम पूर्ण झाल्याचा आनंद आहे. मंदिर समितीचे सदस्य तळेकर, मनज्योत पाटील, अॅड. ललित निकम, दीपक पाटोदकर, प्रशांत देवरे, तहसीलदार वारुळे सर व सदस्यांचे आम्हाला सहकार्य लाभले. चांदीतील नक्षीकामाची कारागिरी आम्ही सेवाभावाने केली आहे,’ असे श्रीकांत कुबेर यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.