NMC Latest News esakal
नाशिक

Kumbh Mela Samiti: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना लागेना मुहूर्त; राज्य शासनाकडून समितीच्या घोषणेची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

Kumbh Mela Samiti : आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना देऊनही समिती गठीत झालेले नाही. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Simhastha Kumbh Mela Awaiting announcement of committee from state government Nashik News)

२०२७-२०२८ मध्ये शहरात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या कामासाठी पालिका, महापालिका, जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य विभागांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करावी लागते.

त्या अनुषंगाने समितीने निश्चित केलेली विकासकामे मार्गी लागतात. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन, साधुग्रामसाठी आरक्षित असलेली जागा, त्यापैकी संपादित जागा व उर्वरित संपादित करावयाच्या जागेबाबत महापालिकेकडून अहवाल मागितला होता.

पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील सिंहस्थ कामांच्या संदर्भात प्राथमिक बैठकीत सिंहस्थ कामांचा सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील महापालिकास्तरावर सिंहस्थ समन्वय समितीला दिल्या होत्या.

त्यानुसार समितीची बैठक घेऊन आवश्यक भूसंपादनासंदर्भात अभ्यास करण्यात आला. त्या संदर्भातील अहवाल २० जानेवारीला शासनाला सादर करण्यात आला आहे. साधुग्राम व रिंग रोडच्या भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतुदीची आवश्यकता आहे.

परंतु, महापालिकेसाठी ही बाब शक्य नसल्याने शासनाने भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापालिकेने शासनाकडे केली आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, एमएसईबी प्रदूषण नियंत्रण महामंडळ, भूसंपादन या शासकीय विभागांचा समावेश असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या सर्व विभागाकडून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचे आराखडे तयार करून घेण्यासाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे नोंदवावी लागते. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीमार्फत होते.

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी राज्य शासनाकडून संनियंत्रण समितीची घोषणा होते. परंतु, सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या अडीच वर्षांवर येऊन ठेपला असताना अद्यापही समितीची घोषणा न झाल्याने राज्यातील सत्तासंघर्षात सिंहस्थ कुंभमेळ्याचा विसर पडल्याची भावना व्यक्त होत आहे.

शासनाला प्रस्ताव सादर

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. नाशिक महापालिका हद्दीमध्ये महापालिका पालक संस्था असल्याने त्यामार्फत विकासकामांचे नियोजन होते. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीच्या तीन बैठका झाल्या असून, साधुग्राम व रिंग रोडच्या भूसंपादनासंदर्भात राज्य शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती अध्यक्ष स्थापन झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT