file photo esakal
नाशिक

Kumbh Mela 2027 : साधूग्राम भूसंपादनासाठी मागविला अहवाल; शासनाकडून सिंहस्थाची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या साधू- महंतांसाठी साधूग्राम उभारले जाणार असून, त्यासाठी भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडून नगररचना संचालकांकडून स्वयंस्पष्टता अहवाल मागविला आहे. (Simhastha Kumbh Mela Report called for Sadhugram land acquisition nashik news)

२०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थात देशभरातून येणाऱ्या साधू- महंतासाठी साधूग्राम उभारले जाते. साधूग्रामसाठी तपोवनात तीनशे एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. मागील सिंहस्थ कालावधीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून ५४ एकर जागा संपादित करण्यात आली होती.

साडेतेरा एकर जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उर्वरित २६४ एकर जागा भूसंपादन करावी लागणार आहे. २६४ एकर भूसंपादनासाठी महापालिकेला जवळपास साडेचार हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र नाशिक महापालिकेला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने आर्थिक मदत करावी किंवा टीडीआर, इन्सेंटिव्ह टीडीआर माध्यमातून भूसंपादनाला मदत करावी अशी महापालिकेची मागणी आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

राज्य शासनाने भूसंपादन करावे यासाठी प्रस्ताव २८ जानेवारीला जिल्हा वार्षिक नियोजनाच्या बैठकीत सादर केला होता. त्याअनुषंगाने शासनाच्या नगर विकास खात्याने साधूग्रामच्या भूसंपादनासाठी नगर संचालक व सहाय्यक संचालक सहसंचालकांकडून भूसंपादन संदर्भात स्वंयस्पष्टता अहवाल मागविला आहे.

रिंगरोडचा प्रस्ताव प्रलंबित

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी ते आडगाव असा ६० मीटर रुंदीचा बाह्य रिंगरोड व आडगाव ते गरवारे पॉइंट यादरम्यान ३६ मीटर लांबीचा रिंगरोड तयार करण्याच्या प्रस्ताव दिला आहे. रिंगरोड भूसंपादनासाठी इन्सेंटिव्ह टीडीआर देण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. परंतु शासनाने रिंगरोड प्रस्तावासंदर्भात अद्याप कुठलाही विचार केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT