Simultaneous both valve replacement and delivery on pregnant woman in smbt hospital nashik news esakal
नाशिक

Nashik News : गर्भवती महिलेवर एकाच वेळी दोन्ही वॉल्व्ह रिप्लेसमेंट अन्‌ प्रसूती; ‘एसएमबीटी’त वाचविला महिलेचा जीव

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वैजापूर तालुक्यातील २३ वर्षीय गर्भवती महिलेला श्वसनाचा त्रास होत होता. या महिलेची प्रसूती तसेच दोन्हीही वॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया एसएमबीटी हॉस्पिटल आयोजित आरोग्यसाधना शिबिरांतर्गत नुकत्याच यशस्वी करण्यात आल्या.

महिला व तिच्या बाळाची तब्येत चांगली असून, त्यांना लवकरच रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ मिळेल, अशी माहिती हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांनी दिली.

घरात नवा पाहुणा येणार, याची आस लावून बसलेल्या वैजापूर तालुक्यातील साजिद यांच्या पत्नीला अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला. (Simultaneous both valve replacement and delivery on pregnant woman in smbt hospital nashik news)

पत्नी गर्भवती, त्यात तिला श्वसनाचा त्रास होऊ लागला. घरची परिस्थिती बेताची, त्यात दवाखान्याचा खर्च यामुळे साजिद आर्थिक विवंचनेत सापडला होता.

पत्नीवर काही करून उपचार करावयाचे असून, तो वेगवेगळ्या रुग्णालयांत जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेत होता. दरम्यान, मित्राने एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पत्नीला दाखविण्याचा सल्ला दिला. संगमनेर येथील ‘ओपीडी’मध्ये हृदयविकारतज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांचा सल्ला घेण्यासाठी साजिद सपत्नीक आले. साजिद यांना डॉ. वर्मा यांनी तत्काळ एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये रुग्ण घेऊन येण्यासाठी सांगितले.

दरम्यान, ‘एसएमबीटी’च्या आरोग्यसाधना शिबिरात साजिद यांनी उपचारांसाठी अर्ज केला. त्यांना पत्नीसाठी संपूर्ण शस्त्रक्रिया व उपचार शासकीय योजनेत मोफत झाले. त्यांच्या डोक्यावर घोंगावणारा कर्जाचा भार आला नाही. साजिद यांच्या पत्नी व्यवस्थित बोलत आहेत; त्यांचे बाळही गोंडस असून, लवकर ‘डिस्चार्ज’ मिळणार आहे.

येथील डॉक्टर तसेच येथील नर्सेस यांनी रुग्णाची खूप काळजी घेतली. मला रुग्णालयात दाखल झाल्यावर रुग्णालयात आहे, असे वाटलेच नाही, अशा शब्दांत साजिदने एसएमबीटी हॉस्पिटलचे आभार मानले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एसएमबीटी हॉस्पिटलच्या आरोग्यसाधना शिबिरात ज्या शस्त्रक्रिया योजनेत बसत नाहीत, अशा आजारांवर रुग्णालयातर्फे अल्पदरात शस्त्रक्रिया केल्या जात असून, आतापर्यंत हजारो दुर्धर आजार असलेल्या सर्वसामान्य रुग्णांनी शिबिरात सहभागी होऊन त्यांचे जीवन सुखकर करून घेतले आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये यंदा कर्करोग, मेंदूसंबंधित आजार, मणकेविकार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मूत्ररोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा, जनरल सर्जरी यासोबतच हृदयविकारांवर मोफत शस्रक्रिया केल्या जात आहेत.

"माझी पत्नी गर्भवती होती. या दरम्यान तिला श्वसनाचा प्रचंड त्रास होत होता. तिला एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डॉ. गौरव वर्मा व डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांनी तिच्यावर हृदय शस्त्रक्रिया केली. तिचे दोन्हीही वॉल्व्ह बदलले, तसेच येथील स्त्रीरोगतज्ज्ञांनी तिची यशस्वी प्रसूतीही केली. बाळ कमी दिवसांचे असले तरी आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत." - साजिद सय्यद, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

"एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट (हृदयविकार विभाग) अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण आहे. येथील कॅथलॅब अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. हृदयविकार तज्ज्ञांची अनुभवी टीम याठिकाणी २४ तास सेवा बजावत आहे. त्यामुळे हृदयविकाराशी कुठलीही समस्या जाणवत असेल तर अंगावर न काढता तत्काळ उपचार करा." - डॉ. विद्युतकुमार सिन्हा, हृदयविकारतज्ज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT