Single roads in city became dual carriageway again nashik news 
नाशिक

Nashik News : शहरातील एकेरी मार्ग बनले ‘पुन्हा’ दुहेरी; पोलिसांच्या अनियमित कारवाई

वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी शहरातील काही मार्गावर एकेरी वाहतुकीसाठी नियोजन केले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी शहरातील काही मार्गावर एकेरी वाहतुकीसाठी नियोजन केले. परंतु खादी वर्दीचा धाक न बाळगता त्यांच्या नाकावर टिच्चून अनेक दुचाकीस्वार थेट एकेरी मार्गात वाहने घुसवून पोलिसांनाच आव्हान देत आहेत.

यात रिक्षाचालकही मागे नसल्याचे चित्र असल्याने गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. (Single roads in city became dual carriageway again nashik news)

वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून काही वर्षांपूर्वी रविवार कारंजा ते टिळकपथ सिंग्नल, अशोक स्तंभ ते रविवार पेठ, मालेगाव स्टॅन्ड ते रामतीर्थ, कपालेश्‍वर मंदिर ते गोगाबाबा पतसंस्था हे मार्ग केवळ एकेरी वाहतुकीसाठी सुरू केले. मात्र कारवाई होत नसल्याने या सर्वमार्गावर बिनदिक्कल दुहेरी वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे या मार्गावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अधून मधून कारवाईही होते, परंतु त्यात सातत्य नसल्याने अनेक जणांना फावते.

यातील रविवार कारंजा ते टिळक पथ सिग्नल व अशोकस्तंभ ते रविवार कारंजा तसेच पंचवटीतील मालेगाव स्टॅन्ड ते रामतीर्थ याभागात दिवसभर मोठी वर्दळ असते. सकाळ सायंकाळी तर गर्दीत दुप्पट वाढ होते, तरीही अनेकजण थेट गर्दीतून या भागात गाड्या आणतात. विशेष म्हणजे यशवंत मंडईजवळ कारवाई करताना पोलिस दिसताच त्यांना हुलकावणी देऊन ही वाहने गल्लीबोळातून पळविली जातात.

सीसीटीव्हींची गरज

सिग्नल तोडून निघून जाणाऱ्यांवर चाप बसावा, म्हणून मेहेर व सीबीएस सिग्नलवर सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याद्वारे ऑनलाइन दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. रविवार कारंजाजवळील पेठे हायस्कूल तसेच अशोक स्तंभ ते रविवार कारंजा या मार्गावर मोक्याचाय ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्यास एकेरी व चुकीच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्याभितीने वचक बसेल.

वाहनचालकांची अरेरावी

शहरातील टिळक पथ सिग्नलवरून सीबीएस, शालीमार, मेनरोड, मेहेर आदी भागात रस्ते जातात. त्यामुळे येथे दिवसभर व रात्री उशीरापर्यंत वाहनांची मोठी गर्दी असते. मात्र अशा गर्दीतही दुचाकीस्वारांसह रिक्षाचालकही बिनदिक्कत घुसत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

मात्र एकेरी मार्गात वाहने घुसविणारे इतर वाहनचालकांवरही अरेरावी करत असल्याचे चित्र आहे. कधीकाळी वकीलवाडी ते अशोकस्तंभ व मेळा स्टॅन्ड ते राजदूत हॉटेल हा मार्गही एकेरी होता, वाढत्या वाहतुकीनंतर हे दोन्ही मार्ग दुहेरी बनले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT