Robbed Bunglow esakal
नाशिक

Nashik Crime News : सिन्नरला घरफोड्यांचे सत्र सुरूच; खंबाळेत भर दुपारी अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : गेल्या आठवडाभरापासून सिन्नरच्या ग्रामीण भागात चोरट्यांनी अक्षरशः दहशत वाजवली आहे दिवसा उजेडी चोरीच्या या घटना घडत असून प्रत्येक ठिकाणी चोरी करण्याच्या प्रकारात साम्य आढळून आल्याने व यात महिला पुरुषांची टोळी कार्यरत असल्याने पोलिसांसमोर देखील चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खंबाळे येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सहा ते सात तोळे सोन्याचे दागिने व चार हजारांची रक्कम असा ऐवज लांबवला. (Sinnar burglary session continues Gold ornaments worth two half lakhs stolen in Khambal in afternoon Nashik Crime News)

खंबाळे दातली रस्त्यावरील चौफुली जवळ खंबाळे शिवारात गावालगत भागवत खंडू आंधळे यांचे घर आहे. या ठिकाणी आंधळे यांच्या चुलते व भावांचे एका रांगेत चार ते पाच घरे आहेत. सध्या कांदे लागवडीची लगीनघाई असल्याने सर्वच कुटुंबे घरापासून अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावरील शेतांमध्ये गेली होती.

चोरट्यांनी ही संधी साधत दुपारी भागवत आंधळे यांच्या घराला लक्ष्य केले. दुपारी एक ते तीन वाजेच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडल्याचे आंधळे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. श्री. आंधळे यांची मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आली असून ती दुपारी एक वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतामध्ये गेली होती.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास भागवत आंधळे हे बाहेरगावाहुन कार्यक्रम आटोपून घरी आले होते. घरी कपडे बदलून त्यांना देखील मळ्यात कांदे लागवडीसाठी जायचे होते. घराचा ओटा चढत असतानाच त्यांना दरवाजाचे कुलूप तोडलेले अवस्थेत आढळून आले. त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता घरातील सर्व सामान्याची उचकापाचक झाल्याचे दिसले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

त्यांनी तातडीने मळ्यातील मुलाला व इतर नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. वावी पोलीस ठाण्यात देखील कळवण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर यांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांनी घरातील संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त केले होते.

कपाटातील कपडे कोठया रिकाम्या केल्या होत्या. श्री. आंधळे यांच्या आईकडे घरातील सर्व दागिने होते ते त्यांनी कोठीत ठेवले होते. चोरट्यांनी कोठी रिकामी केली. सहा ते सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच चार हजार रुपये रोख रक्कम मिळवत उभारा केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वायु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT