Nashik Crime : समृदधी महामार्गावरील सिन्नर येथील टोलनाका तोडफोडप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा अटकपूर्व जामिन अर्ज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. (Sinnar Toll Naka Case MNS city president Datirs pre arrest bail application rejected Nashik News)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गेल्या २३ जुलै रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृदधी महामार्गावरील सिन्नर येथील गोंदे टोल प्लाझाची तोडफोड केली. वाहनांतून आलेल्या १२ ते १५ कार्यकर्त्यांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडे, पाईपाने टोलनाक्याचे नुकसान केले.
तसेच, दगडफेकही केली होती. यावेळी कार्यकर्थ्यांनी घोषणाबाजी करीत शासनाचे ४ ते ५ लाखांचे नुकसान केले होते. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह अक्षय खंदारे, तुषार गांगुर्डे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला हाेता. यावर शनिवारी (ता. ५) सुनावणी होऊन अतिरिक्त सत्र न्यायधीश यु. जे. मोरे यांनी सदरचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.