Dr. Gadhari & Deepa Pawar esakal
नाशिक

Malegaon : बहिणीने स्वत:चे यकृत देऊन भावाला दिले जीवदान

प्रमोद सावंत

सोयगाव (जि. नाशिक) : मनगटावर राखीचा धागा बांधताना त्याच्या दिर्घायुष्याची मनोकामना करणारी आणि प्रत्यक्षातही भावाच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी एक बहीणच दाखवू शकते. मालेगावमधील अशाच एका ४४ वर्षीय बहिणीने आपल्यापेक्षा दोन वर्षे लहान असलेल्या भावास यकृत देऊन जीवदान दिले. बहिणीने भावाचा जीव वाचवल्याने भावाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. (sister donated her own liver to save her brothers life at malegaon Nashik News)

मालेगाव येथील वाडिया रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. हेमंत गढरी यांचा गेल्या दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे त्यांच्या एका पायाची शास्रक्रिया (surgery) करावी लागली. या अपघातातील जखमांमधून सावरण्यासाठी झालेल्या अति गोळ्या व औषधांच्या सेवनामुळे त्यांचे किडनी (Kidney) व यकृत (Liver) निकामी झाले. त्यामुळे ते सतत आजारी पडत होते. डॉक्‍टरांनी त्यांना तुमची किडनी व यकृत निकामी झाले आहेत. तुम्हाला दुसरी किडनी व यकृत बसवावे लागेल असे सांगितले. यकृत बदलले तर तुम्ही जगू शकता असेही डॉक्‍टरांनी सांगितले.

हे सर्व लक्षात घेता डॉ.गढरी यांची बहीण दीपा पवार यांनी यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. चाचण्या केल्यानंतर मोठ्या बहिणीच्या यकृतचे प्रत्यारोपण करता येईल, असा निष्कर्ष निघाला. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मुंबईतील रिलायन्स फौंडेशन हॉस्पिटल (Reliance Foundation Hospital) येथील डॉ.आकाश शुक्ला यांनी घेतला. आठ दिवसांपूर्वी यकृत प्रत्यारोपण शस्रक्रिया (Liver transplant surgery) यशस्वीरित्या पार पडली. जीवनमरणाच्या संकटात सापडलेल्या लहान भावाला स्वतःचे यकृत दान देऊन त्यांचा प्राण वाचवण्याची कामगिरी करणाऱ्या दीपा पवार यांचा निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी माझा लहान भाऊ हेमंत याचा अपघात झाला. त्यात त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. गोळ्या औषधांच्या प्रतिक्रियामुळे हेमांतची किडनी व यकृत निकामी झाले. त्यामुळे प्रत्यारोपणाशिवाय पर्याय उरला नाही. माझे स्वतःचे यकृत देण्याचा निर्णय मी घेतला. त्यात माझे पती धीरज पवार यांची मला साथ मिळाली त्यामुळे हे सर्व शक्य झाले.
- दीपा पवार, बहीण

दोन वर्षांपूर्वी मालेगाव चौफुली येथील जीवन हॉस्पिटल येथे माझी वैद्यकीय सेवा बजावून मी घरी येत असताना माझा अपघात झाला त्यात माझ्या पायाची शस्त्रक्रिया करावी लागली. गोळ्यांच्या प्रतिक्रियामुळे माझे यकृत व किडनी निकामी झाले. माझी मोठी बहीण दीपा हिने मला धीर देत मला स्वतःचे यकृत दिल्याने मी भरून पावलो व मला तिच्यामुळे जीवदान मिळाले. त्यात आमचे मेहुणे धीरज पवार यांचे पाठबळ महत्त्वाचे ठरले.
- डॉ. हेमंत गढरी, वैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT