trimbakeshwar esakal
नाशिक

Trimbakeshwar: त्र्यंबकेश्‍वर मंदिरामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर SIT तपास, पोलिस अधिकाऱ्यांकडून पाहणी

उपमुख्यमंत्र्यांचे आदेश; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा

Trimbakeshwar : येथील ज्योतिर्लिंग मंदिरात शनिवारी (ता. १३) रात्री विशिष्ट जमावाच्या तरुणांनी प्रवेशाचा केलेल्या प्रयत्नासंबंधी गुन्हा दाखल करावा. तसेच अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून तपास करावा.

गेल्या वर्षीच्या घटनेची चौकशी करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आज सायंकाळी या प्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून सामाजिक सलोख्यास तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (SIT investigation registered in Trimbakeshwar temple entry attempt by certain mob controversy nashik news)

विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमप, त्र्यंबकेश्‍वरच्या पोलिस उपअधीक्षक कविता फडतरे, पोलिस निरीक्षक बिपिन शेवाळे आणि गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी आज सकाळपासून पाहणी करत स्थानिकांशी चर्चा केली.

दरम्यान, शहरात शांतता असून नित्य व्यवहार सुरु राहिलेत. मंदिरात दर्शन सुरळीत सुरू होते. पोलिस ठाण्यात रशवी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय दंड विधान कायदा कलम २९५, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री. शेवाळे हे पुढील तपास करत आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती श्री. उमप यांनी दिली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशासंबंधीचे ट्विट केले आहे.

हिंदुत्तवादी संघटनांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा तक्रारी पोलिस ठाण्यात दिल्या होत्या. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात शांतता समितीचे सदस्य आणि संबंधितांची बैठक घेऊन पोलिसांनी सामाजिक सलोखा राहण्याबद्दल सांगत संबंधितांना ताकीद दिली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्र्यंबकेश्‍वरमध्ये धार्मिक वातावरणासोबत सर्वधर्मीयांमध्ये सलोख्याचे नाते नाते आहे. एकमेकांच्या कार्यात सहभागी होण्याची परंपरा आहे. सर्वांनी आपल्या परीने सलोखा अबाधित राखावा, असे शांतता समितीच्या सदस्यांनी सांगितले.

पाच आळीत कार्यक्रम असतो. त्यानिमित्ताने मिरवणूक मंदिरापुढे आल्यावर धूप दाखवत असतो. ही नवी प्रथा अथवा वेगळेपणा नाही. आम्ही सर्व देवतांना मानतो, असेही स्पष्टीकरण देण्यात आले होते.

मुळातच, मिरवणूक काढणारे प्रसाद विकतात. धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या वस्त्रांची विक्री करतात. सगळ्या समाज आणि धर्मीयांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे वेगळे काही झाले असल्याचे वाटत असल्यास माफी मागतो, असाही निर्वाळा देण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT