Ancient Sita Lake esakal
नाशिक

Sita Sarovar : सीता सरोवराचे सुशोभीकरण गरजेचे; प्राचीन राममंदिरामुळे म्हसरूळचे विशेष महत्त्व

योगेश मोरे

पंचवटी (जि. नाशिक) : प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता मातेचा सहवास लाभलेल्या म्हसरूळ गावाला प्राचीन सीता सरोवर आणि राममंदिरामुळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच या ठिकाणचे महत्त्व आणि माहिती असलेले देशभरातील भाविक या ठिकाणी हजेरी लावत आहे.

पौराणिक श्रीक्षेत्र सीता सरोवराचे रामायण सर्किट माध्यमातून सुशोभीकरण लवकर होणे गरजेचे असल्याची भावना येथील नागरिकांमध्ये आहे. (Sita Sarovar Beautification of Sita Sarovar necessary Mhasrul has special importance due to its ancient Ram temple nashik news)

प्रभू रामचंद्रांनी पंचवटीसह गोदाघाट, तपोवन, आशेवाडी येथे वास्तव्य केल्याचेही पुरावे पुरातत्त्व विभागाकडे आहेत. तसेच, दत्त महाराज, मारुती, वज्रेश्वरी देवी, महालक्ष्मी देवी, मरीआई देवी मंदिर, प्राचीन सीता सरोवर व राममंदिरामुळे या म्हसरूळ गावास एक अनन्य साधारण महत्त्व आहे.

प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षे वनवास भोगत असताना त्या काळी पंचवटीत अरण्य होते. त्या वेळी फिरत- फिरत प्रभू श्रीरामचंद्र,  सीता  व लक्ष्मण म्हसरूळ गावी आले होते. त्या वेळी  सीता मातेस तहान लागली. कुठेही पाणी मिळत नव्हते. श्रीरामांनी बाण मारला व त्या ठिकाणी पाणी येऊ लागले.

त्यानंतर तेथे कुटीत राहून सदर पाण्याचा वापर पिण्यासाठी, स्नानासाठी व इतर कामासाठी केला होता, अशी आख्यायिका आहे. कालांतराने ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी सीता सरोवर बांधले व याचे पौराणिक महत्त्व कमी होऊ नये, यासाठी त्याच्या बाजूस एक हौदही बांधला.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

तसेच ज्या ठिकाणी श्रीरामाची कुटी होती, त्या ठिकाणी राममंदिर बांधण्यात आले. महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्याच पंचवार्षिकला या सीता सरोवराचा विकास करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिकांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रमुख आखाड्याचे साधू महंत ध्वजारोहणापूर्वी ध्वज धुण्यासाठी सीता कुंडातील पाणी घेऊन जात व स्नान करत असे. तसेच काही काळापूर्वी सीता सरोवर परिसरात पौष महिन्यांत यात्रा भरत असे.

"पौराणिक श्रीक्षेत्र सीता सरोवराचे रामायण सर्किट माध्यमातून सुशोभीकरण लवकर होणे गरजेचे आहे. म्हणजे आज या धार्मिक व प्रेक्षणीय स्थळाची होणारी दुरवस्था व येथे होणाऱ्या मांस- दारू पार्ट्या बंद होतील. पूर्वी सिता सरोवराचे पवित्र जपले जात होते. तेच यापुढे टिकविण्यासाठी आम्ही ग्रामस्थ अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत असताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे." - रोहिणी उखाडे, ग्रामस्थ तथा सामजिक कार्यकर्त्या, म्हसरूळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT